Vodafone Idea ने Vi Guarantee प्रोग्राम लाँच केलाय. जो ग्राहकांना 130GB मोफत डाटा देतो. 5G सपोर्ट किंवा नवीन 4G स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी ही ऑफर देण्यात येणार आहे. या प्रोग्राम अंतर्गत, वापरकर्त्यांना सलग 13 हप्त्यांमध्ये 10GB अतिरिक्त मोफत डाटा मिळेल. तसेच कंपनीच्या ऑफरचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना पोस्टपेडवर स्विच करण्याची. किंवा नंबर निष्क्रिय करण्याची, त्यांची विद्यमान योजना बदलण्याची गरज नाहीये.
व्होडाफोनचा व्हीआय गॅरंटी कार्यक्रम
व्होडाफोन आयडियाने गेल्या आठवड्यात एका पोस्टमध्ये या ऑफरची घोषणा केली होती. ग्राहकांना एक वर्षाच्या कालावधीत एकूण 130GB अतिरिक्त डाटा मिळणार आहे. अतिरिक्त डाटा ग्राहकाच्या खात्यात प्रत्येकी 10GB डेटा हा 13 हप्त्यांमध्ये जमा केला जाईल, जो 28 दिवसांसाठी वैध असेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, वापरकर्त्यांनी अमर्यादित दैनिक डेटा पॅक असलेले प्रीपेड ग्राहक असणे आवश्यक आहे. ज्याची किंमत 239 रुपये ते 3,199 रुपये आहे. या ऑफरच्या संपूर्ण कालावधीसाठी वापरकर्त्यांना हाच पॅक 28 दिवसांच्या 13 हप्त्यांमध्ये रिचार्ज करावा लागेल.
जर एखाद्या वापरकर्त्याने पोस्टपेडवर स्विच केले किंवा त्यांचा नंबर निष्क्रिय केला तर त्यांना उर्वरित फायदे मिळणार नाहीत. वापरकर्त्यांकडे 5G किंवा नवीन 4G स्मार्टफोन असणे देखील आवश्यक आहे. ही ऑफर कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, ईशान्य आणि ओरिसाच्या दूरसंचार मंडळांमध्ये उपलब्ध नाही. तसेच ही मर्यादित ऑफर 25 मे ते 14 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. जेव्हा वापरकर्ते त्यांचा रोजचा डाटा मर्यादा संपवतात तेव्हाच अतिरिक्त डाटा वापरण्यास मिळणार आहे.
व्ही गॅरंटी प्रोग्राम ऑफर कसा करणार चालू?
वापरकर्त्यांनी प्रथम ते व्होडाफोन आयडिया नेटवर्कवर आहेत आणि 4G किंवा 5G स्मार्टफोन वापरत आहेत.
जर वोडाफान आयडिया सिम युझर जर कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, नॉर्थ ईस्ट आणि ओरिसा येथील टेलिकॉम सर्कलचे असतील तर त्यांना या ऑफरचा लाभ घेता येणार नाही.
पात्र युझर्स त्यांच्या स्मार्टफोनवर 121199 किंवा 199199# डायल करू शकतात.
एकदा USSD कोड सक्रिय झाल्यानंतर, त्यांना स्टेप्स फॉलो करावे लागतील आणि ऑफरचा क्लेम करावा लागेल.
एकदा असे झाले की त्यांना एक पुष्टीकरणाचा मेसेज येईल. हा मेसेज आला तर ऑफर लागू झाल्याचं खात्री होईल.
त्यानंतर वापरकर्ते USSD कोड *199# वापरून अतिरिक्त डेटा देखील तपासू शकतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.