Vivo V60e: जबरदस्त बॅटरी अन् दमदार फीचर्ससह Vivo V60e भारतात लाँच; किंमत किती?

Vivo V60e Smartphone Launched: विवोने आपल्या V सीरीजमधील अजून एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा नवीन Vivo V60e स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह लाँच झाला आहे.
Vivo V60e
Vivo V60eSaam Tv
Published On

स्मार्टफोन ही काळाची गरज आहे. आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनवरुन तुम्ही कोणतेही काम काही मिनिटांत करु शकतात. दरम्यान, जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. विवो कंपनीने भारतात आपल्या V सीरीजमधील नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. भारतात Vivo V60e स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.

विवोच्या Vivo V60e या स्मार्टफोनमध्ये अनेक आकर्षक फीचर्स देण्यात आले आहे. कॅमेरा क्वालिटीदेखील खूप उत्तम आहे. याचसोबत स्मार्टफोनची किंमतदेखील मध्यमवर्गीयांना परवडणारी आहे. या स्मार्टफोनमध्ये चांगला डिस्प्ले आणि बॅटरी लाइफदेखील जास्त आहे.

Vivo V60e
Apple iPhone 17e लाँचिंगची तारीख ठरली, जाणून घ्या फिचर्स अन् किंमत

स्मार्टफोनची खासियत

या Vivo V60e स्मार्टफोनमध्ये ६.७७ इंचाचा Quad Curved AMOLED स्क्रिन दिली आहे. ज्याचे रिफ्रेश रेट 120Hz तर पीक ब्राइटनेस १,६०० नीट्स आहे. यामुळे डिस्प्ले अधिक मोठा आणि ब्राइट दिसणार आहे. या स्क्रिनवर डायमंड शील्ड ग्लास प्रोटेक्शन आहे. याचसोबत Low Blue Light सर्टिफिकेशन आहे.

Vivo V60 स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे. 200MP प्रायमरी लेन्स आहे. ज्यामध्ये OIS आणि 30x पर्यंतचा झूम सपोर्ट मिळतो. याचसोबत 85mm पोर्ट्रेट फ्रेमिंगसाठी ऑप्टिमायजेशन आहे. याचसोबत 8MPचा अल्ट्रा वाइड लेन्स आहे. तर फ्रंट कॅमेरा 50MP Eye Auto-Focus Group Selfie Camera चा आहे.

Vivo V60e
5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

बॅटरी

या स्मार्टफोनमध्ये 6,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 90W वायर्ड फास्ट-चार्जिंगला सपोर्ट देते. यामुळे स्मार्टफोन हा अजूनच चांगला होतो. तुम्हाला एकदा चार्जिंग केल्यावर खूप दिवस बॅटरी लाइफ राहिल.

किंमत

या स्मार्टफोनची 8GB + 128GB वेरिएंट ची किंमत २९,९९९ रुपये आहे. 8GB + 256GB मॉडेलची किंमत ३१,९९९ रुपये आहे. 12GB + 256GB टॉप वेरिएंटची किंमत ३३,९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये दोन कलर उपलब्ध आहेत.

Vivo V60e
Vivo T4 Pro 5G: तीन दिवसात लॉन्च होणार Vivo चा बजेट फोन, जाणून घ्या धमाकेदार फीचर्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com