Vivo T4 Pro 5G: तीन दिवसात लॉन्च होणार Vivo चा बजेट फोन, जाणून घ्या धमाकेदार फीचर्स

Vivo T4 Pro 5G हा फोन २६ ऑगस्ट रोजी भारतात लाँच होईल. या फोनची किंमत भारतात २५,००० ते ३०,००० रुपयांच्या दरम्यान असेल. डिझाइन आणि फीचर्स प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये याला खास बनवतात.
Vivo T4 Pro 5G
Vivo T4 Pro 5G launching in India on August 26 – Budget-friendly phone with premium design and powerful features.saam tv
Published On
Summary
  • Vivo T4 Pro 5G भारतात 26 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे.

  • फोनची किंमत 25,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान असेल.

  • प्रीमियम डिझाइन आणि दमदार फीचर्समुळे हा फोन खास ठरणार आहे.

  • भारतीय ग्राहकांसाठी हा मिड-रेंज सेगमेंटमधील एक आकर्षक पर्याय ठरणार आहे.

भारतीय मोबाईल बाजारपेठेतील आपला जलवा दाखवण्यासाठी विवो कंपनी वा फोन लॉन्च करत आहे. कंपनीने या तीन दिवसात म्हणजेच २६ ऑगस्ट रोजी Vivo T4 Pro 5G फोन लॉन्च करणार आहे. Vivo T4 Pro 5Gलॉन्च होताच ग्राहकांच्या दुकानाबाहेर रांगा लागतील. त्यामागे एक कारण आहे, ते म्हणजे या फोनची किंमत. कंपनी तुमच्या बजेटमधील तुम्हाला परवडेल अशा किंमतीत फोन लॉन्च करणार आहे. त्यासह या मोबाईलचे फीचर्स देखील शानदार आहेत.

हा फोन फ्लिपकार्टवर आधीच लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन निळ्या आणि सोनेरी रंगात उपलब्ध असेल असं सांगण्यात आलंय. यात क्वाड-कर्व्हड AMOLED डिस्प्ले असेल, ज्याची जाडी फक्त ७.५३ मिमी असेल. डिझाइनबद्दल म्हणाल तर मग तुम्ही मोबाईलकडे एक टक बघतच राहल. मागील बाजूस एक गोळीच्या आकाराचा कॅमेरा मॉड्यूल असेल, ज्यामध्ये दोन कॅमेरे, तिसरा सेन्सर आणि ऑरा लाईट रिंग असेल.

फोटोग्राफी प्रेमींसाठी हा फोन उत्कृष्ट असणार आहे. या फोनमध्ये ५०-मेगापिक्सेलचा सोनी IMX882 टेलिफोटो लेन्स असेल, जो ३X ऑप्टिकल झूमला सपोर्ट करेल. याशिवाय यात एआयचे फीचर्स असतील, ज्यामुळे फोटो आणि व्हिडिओ शानदार येतील. हे फीचर मागील मॉडेल Vivo T3 Pro 5G पेक्षा अधिक शक्तिशाली आहे. मागील मॉडेलमध्ये 5,500mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसर होता. Vivo T3 Pro 50MP Sony IMX882 प्रायमरी कॅमेरा, 16MP सेल्फी कॅमेरा आणि 6.77 इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्लेसह लाँच करण्यात आला होता. त्याची बॅटरी 5,500mAh होती

Q

T4 Pro 5G फोन कधी लॉन्च होणार आहे?

A

Vivo T4 Pro 5G भारतात 26 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे.

Q

या फोनची किंमत किती असणार आहे?

A

या फोनची भारतातील किंमत 25,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान असेल.

Q

या फोनचे खास फीचर्स कोणते आहेत?

A

प्रीमियम डिझाइन, दमदार परफॉर्मन्स, उत्तम कॅमेरा आणि बॅटरी हे या फोनचे प्रमुख फीचर्स आहेत.

Q

Vivo T4 Pro 5G कोणत्या सेगमेंटमध्ये उपलब्ध असेल?

A

हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये उपलब्ध होणार असून बजेटमध्ये फिट बसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com