Apple iPhone 17e लाँचिंगची तारीख ठरली, जाणून घ्या फिचर्स अन् किंमत

Apple New Phone: अ‍ॅपल आयफोन १७ईच्या लाँचबाबत चर्चेला उधाण आहे. माहितीनुसार, फोनच्या फीचर्स, किंमत आणि लाँच टाइमलाइन समोर आली आहेत. चला पाहूया कोणती नवीन अपग्रेड्स आणि संभाव्य किंमत अपेक्षित आहे.
APPLE IPHONE 17E LAUNCH DATE ANNOUNCED WITH FEATURES AND PRICE
APPLE IPHONE 17E LAUNCH DATE ANNOUNCED WITH FEATURES AND PRICE
Published On

भारतात अ‍ॅपलची नवीन iPhone 17 लाँच झाला असून ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेनंतर आता कंपनी आपला पुढील परवडणारा स्मार्टफोन, म्हणजे iPhone 16e चे अपग्रेड लाँच करण्याच्या तयारीत आहे. अ‍ॅपलने या फोनबाबत अधिकृतपणे काही माहिती दिलेली नसली तरी सध्या अनेक लीक आणि अहवालांमधून त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि किंमतीबद्दल माहिती समोर आली आहे.

डिजिटच्या अहवालानुसार, आगामी iPhone 17e मध्ये ६.१-इंचाचा सुपर रेटिना OLED डिस्प्ले असण्याची शक्यता असून त्यात १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. याशिवाय, फोनमध्ये अ‍ॅपलचा अत्याधुनिक A19 बायोनिक प्रोसेसर देण्यात येणार असून तो ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबीपर्यंतच्या स्टोरेज पर्यायासह सुसज्ज असेल. सध्याच्या iPhone 16e मध्ये A18 बायोनिक चिप आहे, त्यामुळे हा मॉडेल परफॉर्मन्समध्ये मोठा अपग्रेड ठरणार आहे. तसेच फोनमध्ये ४,००० एमएएच क्षमतेची बॅटरी मिळू शकते, जी वायरलेस चार्जिंगसह येण्याची शक्यता आहे.

APPLE IPHONE 17E LAUNCH DATE ANNOUNCED WITH FEATURES AND PRICE
Jio And Airtel: ₹५०० पेक्षा कमीत रिचार्ज प्लॅन; Jio की Airtel, कोण देतेय जास्त फायदा? वाचा सविस्तर

कॅमेरा विभागातही या फोनमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. मागील बाजूस iPhone 16e प्रमाणेच ४८ मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा असू शकतो, मात्र फ्रंट कॅमेरा १२ मेगापिक्सेलवरून सुधारून १८ मेगापिक्सेल करण्यात येईल, ज्यामुळे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव अधिक स्पष्ट होईल.

APPLE IPHONE 17E LAUNCH DATE ANNOUNCED WITH FEATURES AND PRICE
Jio And Airtel Recharge: ग्राहकांसाठी खुशखबर! जिओ-एअरटेलच्या 'या' रिचार्जवर मिळणार डेटा व कॉलिंगसह Netflix सबस्क्रिप्शन फ्री

किमतीबाबत बोलायचे झाले तर, iPhone 16e ची सुरुवातीची किंमत ५९,९०० रुपये होती, तर लीकनुसार या नवीन iPhone 17e चे प्रारंभिक मूल्य ६४,९०० रुपये असण्याची शक्यता आहे. हे मॉडेल अ‍ॅपलच्या प्रीमियम डिझाइनसह कार्यक्षमतेवर अधिक भर देणारे असेल.

APPLE IPHONE 17E LAUNCH DATE ANNOUNCED WITH FEATURES AND PRICE
iPhone 17 Pro: 'या' ५ देशांमध्ये Apple iPhone 17 Pro स्वस्तात मिळणार, ₹37,424 होईल बचत

फोनच्या लाँचबद्दल अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नसली, तरी चर्चेनुसार iPhone 17e पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारी २०२६ मध्ये भारतीय बाजारात पदार्पण करू शकतो. अ‍ॅपलचे हे नवीन मॉडेल मिड-रेंज प्रीमियम सेगमेंटमध्ये ग्राहकांसाठी आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com