Jio And Airtel Recharge: ग्राहकांसाठी खुशखबर! जिओ-एअरटेलच्या 'या' रिचार्जवर मिळणार डेटा व कॉलिंगसह Netflix सबस्क्रिप्शन फ्री

OTT Benefits: जिओ आणि एअरटेलचे खास प्लॅन ग्राहकांना मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसह उपलब्ध. या रिचार्जमध्ये दररोज डेटा, कॉलिंगसह अनेक अतिरिक्त फायदे मिळतात.
FREE NETFLIX SUBSCRIPTION WITH JIO AND AIRTEL RECHARGE PLANS
FREE NETFLIX SUBSCRIPTION WITH JIO AND AIRTEL RECHARGE PLANS
Published On
Summary
  • नेटफ्लिक्स हे भारतातील सर्वात महागडे सबस्क्रिप्शन आहे.

  • जिओ व एअरटेलच्या प्रीपेड प्लॅन्समध्ये नेटफ्लिक्स मोफत दिले जात आहे.

  • जिओचे प्लॅन १,२९९ आणि १,७९९ रुपयांना उपलब्ध आहेत.

  • एअरटेलचा १,७९८ रुपयांचा प्लॅन विशेषतः बेसिक नेटफ्लिक्ससाठी उपयुक्त आहे.

भारतातील ओटीटी मार्केटमध्ये नेटफ्लिक्स(Netflix) हे सर्वात महागडे सबस्क्रिप्शन मानले जाते. मात्र ग्राहकांना जर योग्य टेलिकॉम प्लॅन निवडला तर हे महागडे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफतही मिळू शकते. देशातील आघाडीच्या टेलिकॉम ऑपरेटर्समध्ये जिओ आणि एअरटेल हे दोन्ही अशा प्लॅनची सुविधा देत आहेत ज्यामध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन अतिरिक्त खर्च न करता मोफत दिले जात आहे. यामुळे ग्राहकांना प्रीमियम कंटेंटचा आनंद घेताना टेलिकॉम सेवा देखील मिळत आहे.

जिओचा मोफत नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन

जिओने(Jio) आपल्या ग्राहकांसाठी दोन खास प्रीपेड प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी पहिला प्लॅन १,२९९ रुपयांचा असून त्यामध्ये ग्राहकांना मोबाईलसाठी नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन दिले जाते. हा प्लॅन ८४ दिवसांसाठी वैध असून यामध्ये दररोज २ जीबी डाटा, १०० एसएमएस मेसेजेस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय त्यात ९० दिवसांसाठी जिओहॉटस्टार तसेच जिओच्या सर्व अ‍ॅप्सचा वापर करण्याची संधीही मिळते. स्मार्टफोनवर स्ट्रीमिंगचा आनंद घ्यायचा असेल तर या प्लॅनमधील नेटफ्लिक्स मोबाईल सबस्क्रिप्शन ग्राहकांसाठी योग्य ठरते.

FREE NETFLIX SUBSCRIPTION WITH JIO AND AIRTEL RECHARGE PLANS
Jio Recharge Plan: सप्टेंबर २०२६ पर्यंत रिचार्जची चिंता मिटली! एकदाच रिचार्ज करा, संपूर्ण वर्षभर मोबाईल वापरा

जिओचा मोफत नेटफ्लिक्स बेसिक प्लॅन

दुसरा जिओ प्लॅन १,७९९ रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना बेसिक नेटफ्लिक्स प्लॅन मिळतो जो मोबाईल डिव्हाइससह लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर देखील वापरता येतो. यातही ८४ दिवसांची वैधता असून दररोज ३ जीबी डाटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस संदेशांचा समावेश केला गेला आहे. याशिवाय जिओटीव्ही(JioTv), जिओक्लाउड(Jio Cloud) आणि ९० दिवसांसाठी जिओहॉटस्टारचा(JioHotstar) प्रवेशही मिळतो.

FREE NETFLIX SUBSCRIPTION WITH JIO AND AIRTEL RECHARGE PLANS
Jio Recharge Plan: नवीन धमाका ऑफर! वार्षिक प्लॅन नको? मग घ्या जिओचा २०० दिवसांसाठी किफायतशीर प्रीपेड पॅक

एअरटेलचा मोफत नेटफ्लिक्स बेसिक प्लॅन

एअरटेलकडून(Airtel) देखील या शर्यतीत आकर्षक ऑफर दिल्या गेल्या आहेत. एअरटेल यूजर्ससाठी उपलब्ध असलेला १,७९८ रुपयांचा प्लॅन ८४ दिवस वैध असून यात नेटफ्लिक्स बेसिक सबस्क्रिप्शन दिले जाते. ग्राहकांना दररोज ३ जीबी डाटा, १०० एसएमएस आणि सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय एअरटेल एक्सस्ट्रीम, मोफत हॅलोट्यून्स आणि अपोलो २४/७ या सेवांचा देखील लाभ घेता येतो.

FREE NETFLIX SUBSCRIPTION WITH JIO AND AIRTEL RECHARGE PLANS
Jio Recharge Plan: जिओची नवी ऑफर! गेमिंग प्लॅनची सुरुवात फक्त ४८ रुपयांपासून; डेटा, कॉलिंग अन् दमदार ऑफर्स

या सगळ्या योजना बघता, मोबाईल डिव्हाइसवर नेटफ्लिक्स वापरणाऱ्या ग्राहकांसाठी जिओचा कमी दरातील प्लॅन फायदेशीर तर स्मार्ट टीव्ही किंवा लॅपटॉपवर कंटेंट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी जिओ आणि एअरटेलचे बेसिक सबस्क्रिप्शन समाविष्ट असलेले प्लॅन अधिक उपयुक्त ठरतात. यामुळे ग्राहकांना डेटा आणि कॉलिंगच्या सुविधेसह महागडे ओटीटी सबस्क्रिप्शन विनामूल्य मिळण्याची संधी मिळते.

Q

भारतात नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन महागडे का मानले जाते?

A

भारतात नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन महागडे का मानले जाते?

Q

जिओ कोणत्या प्लॅनमध्ये मोफत नेटफ्लिक्स देते?

A

जिओ १,२९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मोबाइल सबस्क्रिप्शन आणि १,७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये बेसिक नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन देते.

Q

एअरटेलच्या कोणत्या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स मिळते?

A

 एअरटेल १,७९८ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसोबत बेसिक नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन उपलब्ध करून देते.

Q

बेसिक नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन आणि मोबाइल सबस्क्रिप्शनमध्ये काय फरक आहे?

A

मोबाइल सबस्क्रिप्शन फक्त स्मार्टफोन व टॅब्लेटवर चालते, तर बेसिक सबस्क्रिप्शन टीव्ही व लॅपटॉपवरदेखील चालते.


सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com