Vima Sakhi Yojana: महिलांना महिन्याला मिळणार ७००० ते २१००० रुपये, नेमकी ही योजना आहे तरी काय?

Vima Sakhi Yojana For Women: सरकारने महिलांसाठी खास वीमा सखी योजना राबवली आहे. वीमा सखी योजनेत महिलांना एलआयसी एजंट म्हणून काम करावे लागणार आहे.
Vima Sakhi Yojana
Vima Sakhi YojanaSaam Tv
Published On

भारत सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीदेखील अनेक योजना राबवल्या आहेत. प्रत्येक राज्याने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. महिला सशक्तिकरणासाठी ही योजना राबवली जाते.सरकारने महिलांसाठी वीमा सखी योजना राबवली आहे.या योजनेअंतर्गत महिलांना ७००० ते २१००० रुपये दिले जातात.

ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे. (Vima Sakhi Yojana For Women)

Vima Sakhi Yojana
Ladki Bahin Vs Lek Ladki: लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये तर लाडक्या लेकींना १ लाख रुपये; दोन्ही योजनांमध्ये फरक काय?

वीमा सखी योजना (Vima Sakhi Yojana)

महिलांसाठी वीमा सखी योजना राबवली आहे. महिलांना या योजनेत वीमाशी संबंधित काम दिले जाते. त्यानंतर त्यातून त्यांना महिन्याला उत्पन्न दिले जाते. भारतीय वीमा निगममध्ये महिलांना वीमा सखी म्हणून नियुक्त केले जाईल. त्यानंतर त्यांना एलआयसी एजेंट केले जाते.

ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना या योजनेमुळे रोजगार निर्माण होणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आत्मनिर्भर केले जाते.

मिळणार इतके रुपये

वीमा सखी योजनेत महिलांना ७,००० ते २१,००० रुपये दिले जातात. सुरुवातीला ७००० रुपये सरकाकडून दिले जातात. त्यानंतर पुढच्या वर्षी ही रक्कम १००० रुपयांनी कमी केली जाते. त्यानंतर तिसऱ्या वर्षी ५००० रुपये दिले जातात.याचसोबत महिलांना २१००० रुपये दिले जातात. तसेच तुम्ही टार्गेट पूर्ण केल्यावर कमिशनदेखील दिले जाते.

Vima Sakhi Yojana
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

सरकारकडून या योजनेच्या सुरुवातील पहिल्या फेजमध्ये महिलांना ३५,००० रुपये वीमा एजंटसाठी दिले जाते. या योजनेत महिलांना ५०,००० रुपयांचादेखील लाभ मिळू शकतो. १८ ते ५० वर्षांपर्यंतच्या महिला या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची शैक्षणिक पात्रता १०वी पास असणे गरजेचे आहे.

Vima Sakhi Yojana
EDLI scheme: EDLI योजनेच्या कालावधीत तीन वर्षांची वाढ, असा घेता येणार लाभ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com