Retirement Investment: वयाच्या ३० व्या वर्षी करा NPS योजनेत गुंतवणूक, निवृत्तीनंतरही व्हाल मालामाल

निवृत्तीनंतर नियोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे. निवृत्तीनंतर आपल्या विविध गरजासांठी पैशाचे नियोजन करावे लागते. यासाठी लोक पैसे (Money) गुंतवणूक करतात.
Retirement Investment
Retirement InvestmentSaam Tv

निवृत्तीनंतर नियोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे. निवृत्तीनंतर आपल्या विविध गरजासांठी पैशाचे नियोजन करावे लागते. यासाठी लोक पैसे (Money) गुंतवणूक करतात.

जर तुम्ही देखील पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सरकारची NPS (National Pension System) योजना आहे. ज्याचा तुम्ही फायदा घेऊन योग्य प्रकारे गुंतवणूक करू शकता.

Retirement Investment
Petrol Diesel Rate : पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जाहीर; वाचा मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील किंमती

NPS (National Pension System) ही एक सेवानिवृत्ती योजना आहे. या योजने अंतर्गत तुम्ही पैशांची गुंतवणूक करून तुम्ही निवृत्ती नंतरचे आयुष्य आनंदात घालवू शकता. निवृत्ती झाल्यानंतर आर्थिक नियोजन करताना पैशाचा अचूक हिशोब ठेवला जातो. तुम्हाला एकूण किती पैसे गुंतवायचे आहेत, तसेच किती पैसे खर्चासाठी ठेवावे लागणार आहेत याचा विचार करावा लागतो. यासाठी वयाच्या ३० व्या वर्षी गुंतवणूक केली तर तुम्हाला निवृत्त झाल्यानंतर आर्थिक अडचण येणार नाही. ६० व्या वर्षी निवृ्त्त झाल्यानंतर देखील तुमच्या गरजा या पूर्ण होतील.

Retirement Investment
ITR: इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! एक चूक अन् सगळे पैसे अडकणार

३० व्या वर्षी कशी कराल गुंतवणूक?

NPS ही एक नॅशनल पेन्शन योजना आहे. या सेवानिवृत्ती योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन मिळते.दरवर्षी तुम्ही ६००० रूपयांची गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक निवृत्तीपर्यंत चालू ठेवावी.

जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजे निवृत्तीच्या वेळी ६० टक्के रक्कम तु्म्हाला काढता येते. आणि उरलेली ४० टक्के रक्कम वार्षिक गुंतवणूक करता येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com