ITR: इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! एक चूक अन् सगळे पैसे अडकणार

ITR News: आयटीआर फाइल करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले नाही तर तुमचे पैसे अडकू शकतात.
ITR News
ITR NewsGoogle

आयकर भरणाऱ्यासांठी एक महत्त्वाची बातमी आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि मूल्यांकन वर्ष २०२४-२५ साठी आयकर रिटर्न भरण्याची प्रोसेस सुरु झाली आहे. टॅक्स स्लॅब अंतर्गत सर्व करदात्यांना आयटीआर भरणे आवश्यक आहे. आयटीआर फाइल करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले नाही तर तुमचे पैसे अडकू शकतात.

आयटीआर फाइल करताना ई- व्हेरिफिकेशन करणे खूप आवश्यक आहे. ई व्हेरिफिकेशन केल्यावर तुमच्या माहिती पडताळणी केली जाते. जर तुम्ही आयटीआर फाइल करताना ई- व्हेरिफिकेशन केले नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आयटीआर रिटर्न करताना तुम्ही या गोष्टींची काळजी घ्या.

ई व्हिरिफिकेशन करणे आवश्यक

आयटीआर फाइल करताना ई फायलिंगनंतर ई- व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ई फायलिंग केल्यानंतर ई व्हेरिफिकेशन केले नाही तर तुम्हाला परताव्याचे पैसे वेळेत मिळणार आहे. ई व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ज, डिमॅट अकाउंट, एटीएम नेट बँकिंग या डिजिटल सर्टिफिकेटची आवश्यकता असते.

ITR News
Car Registration Rise: वाहन उद्योगात मोठी उलथापालथ; अक्षय्य तृतीयेला खरेदी वाढली, बुकिंग ४० टक्के

अशा पद्धतीने ई- व्हेरिफिकेशन करा

  • सर्वप्रथम https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या पोर्टलवर जा.

  • यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून पोर्टलवर लॉग इन करा.

  • ई फाइल मेन्यूवर क्लिक करुन ई व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडा.

  • यानंतर तुमचे मुल्यांकन वर्ष, पॅन कार्ड नंबर, आयटीआर पावती क्रमांक, मोबाइल नंबर ही माहिची भरा.

  • यानंतर ई व्हेरिफिकेशन मोड हा पर्याय निवडा.

  • यानंतर तुम्ही आधार कार्ड, एटीएम कार्ड, डिमॅट अकाउंटच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन पूर्ण करु शकता.

ITR News
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेनिमित्त कन्यारत्न प्राप्त झालंय; मग माता लक्ष्मीची 'ही' नावं चिमुकलीचं भाग्य उजळवतील

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com