ITR Filling: ३१ जुलैपर्यंत आयटीआर भरला नाही? मुदतीनंतर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जाणून घ्या

ITR Filling Deadline: वर्ष संपण्यापूर्वी काही कामे करणे गरजेचे आहे. त्यातील एक म्हणजे आयटीआर भरणे. २०२२-२३ मध्ये आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ होती. जर तुम्ही या काळात आयटीआर भरला नसेल तर तुम्ही अजूनही आयटीआर भरु शकतात.
ITR Filling
ITR Filling Saam tv
Published On

ITR Filling Last Date:

वर्ष संपायला फक्त २ दिवस बाकी आहेत. वर्ष संपण्यापूर्वी काही कामे करणे गरजेचे आहे. त्यातील एक म्हणजे आयटीर भरणे. २०२२-२३ मध्ये आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ होती. जर तुम्ही या काळात आयटीआर भरला नसेल तर तुमच्यासाठी Belated ITR भरण्याची संधी आहे. जर तुमचा अर्ज अजूनही भरला नसेल तर तुम्ही Belated ITR भरु शकतात. हा अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. (Latest News)

ज्यांनी ३१ जुलै २०२३ आधी आयटीआर भरला नाही. ते लोक ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ५००० दंड भरुन आयटीआर (ITR)अर्ज दाखल करु शकतात. तसेच हा अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे. मूळ आयटीआरमधील चुका सुधारण्यासाठी हा आयटीआर दाखल केला जातो.

Belated ITR कसा भरावा

Belated ITR भरण्याची प्रोसेस सामान्य आयटीआर भरण्यासारखीच आहे. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आयकर ई-फायलिंग पोर्टलवर त्यांच्या खात्यात लॉगिन करणे आवश्यक आहे.

ITR Filling
Rules Change In 1st January 2024 : नवे वर्ष, नवे नियम! LPG पासून ते बँकेच्या नियमापर्यंत होणार मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री

दंड

मुदतीनंतर जर तुम्ही आयटीआर भरत असाल तर सर्वप्रथम दंड, कर आणि व्याज जमा केले आहे का ते चेक करा.

आयकर कायद्याअंतर्गत तुम्ही जर उशिरा आयटीआर भरत असाल तर ५,००० रुपये दंड आकारला जातो. तसेच ज्यांचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असेल त्यांना १,००० दंड भरावा लागेल.

जर तुम्ही मुदतीनंतर आयटीआर भरत असाल तर तो दंडाच्या रक्कमेसह भरावा लागेल. जर तुम्ही कर उशीर भरल्यास दरमहिना १ टक्के व्याज आकारले जाते.

ITR Filling
Xiaomi First Electric Car: शाओमीची जबरदस्त इलेक्ट्रिक कार Tesla ला देणार टक्कर, स्मार्टफोनलाही होणार कनेक्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com