Xiaomi First Electric Car: शाओमीची जबरदस्त इलेक्ट्रिक कार Tesla ला देणार टक्कर, स्मार्टफोनलाही होणार कनेक्ट

Xiaomi SU7 : Xiaomi कंपनी आपल्या स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध आहे. स्मार्टफोननंतर आता कंपनीनी इलेक्ट्रिक कारची घोषणा केली आहे. 28 डिसेंबरला कंपनीने ही घोषणा केली आहे.
 Xiaomi First Electric Car
Xiaomi First Electric CarSaam Tv
Published On

Xiaomi First Electric Car Launched:

शाओमी (Xiaomi) कंपनी आपल्या स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध आहे. कंपनीने स्मार्टफोनमध्ये खूप नाव कमावले आहे. स्मार्टफोननंतर आता कंपनीनी इलेक्ट्रिक कारची घोषणा केली आहे. 28 डिसेंबरला कंपनीने ही घोषणा केली आहे. कंपनीची आपली पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात येणार आहे.

कंपनीला जगातील टॉप ५ ऑटोमेकरपैकी एक बनायचे आहे, असे कंपनीने सांगितले आहे. कंपनीच्या या नवीन कारचे नाव Xiaomi SU7 आणि SU7 Max आहे. कंपनीने या दोन्ही कारच्या बिल्ड क्वालिटीवर काम केले आहे. ही कार स्मार्टफोनच्या सिस्टीमशी जोडली जाणार आहे. (Latest News)

इंजिन (Engine)

Xiaomi SU7 आणि SU7 Max कार Xiaomi Hyperइंजिन V6/V6s सह 21000rpm सह प्रदान केले जाणार आहे. ही कार कंपनीच्या लोकप्रिय स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टीमशी जोडली जाण्याची शक्यता आहे. कारच्या किमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाहीये.

ही कार पोर्श (porsche)आणि टेस्लाशी (Tesla) स्पर्धा करेल. म्हणजेच ही कार लक्झरी सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे, असे कंपनीने सांगितले. या कारसाठी आम्ही १५ ते २० वर्ष काम केले आहे. आम्ही लवकरच जगातील टॉप ५ ऑटोमेकर बनू. यामुळे ऑटोमोबाईल उद्योगाला मदत होईल. इतर कंपन्यांप्रमाणे Xiaomi कंपनीने ईलेक्ट्रिक वाहन उत्पादनात प्रवेश केला आहे, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

 Xiaomi First Electric Car
PPF Investment Plan: फक्त ५००० रुपयात कमवा २६.६३ लाख रुपये, जाणून घ्या लखपती होण्याचा सोपा मार्ग

Xiaomi ची ही पहिली इलेक्ट्रिक कार HyperOS सह येते. कंपनीने कारच्या इंटीरियरवर काम केले आहे. याला गॅलेक्सी ग्रे रंग देण्यात आला होता. फोनमध्ये 16.1 इंच टच स्क्रीन देण्यात आले आहे. हे सेंट्रल कंट्रोल स्क्रीन कीबोर्डएक्सपेंशला सपोर्ट करते. कारला ट्रेडिशनल डी-आकाराच्या स्टीयरिंग व्ही देण्यात आले आहे. ते खूपच आरामदायक आहे. शिवाय, कारची रचना स्पोर्टी आहे. त्यामुळे कारचा खूप छान लूक आहे.

 Xiaomi First Electric Car
Xiaomi Electric Car : शाओमी मोबाइल कंपनी आणणार इलेक्ट्रिक कार, या मोठ्या बिझनेसमनशी होणार भागीदारी? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com