भविष्यात येणाऱ्या संकटांशी दोन हात करायचे म्हटलं तर आपल्या हाताशी पैसा असलेला चांगलं असतं. भविष्यात आर्थिक चणचण भासू नये,यासाठी आज गुंतवणूक करणं गरजेचं आहे. जर तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला असा एक प्लान सांगणार आहोत जो, तुम्हाला लखपती बनवून देईल. तेही फक्त ५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीत. (Latest News)
गुंतणूक investment कराचयची असेल तर तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF योजना सर्वोत्तम आहे. भारतातील कोणताही नागरिक (citizen) यामध्ये गुंतवणूक (investment) करू शकतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यामध्ये उपलब्ध असलेले फायदे खूप चांगले आहेत. जर तुम्ही बँकेत (bank) किंवा पोस्ट ऑफिसमध्ये (post office) गेलात तर तेथील गुंतणवूक सल्लागार तुम्हाला पीपीएफमध्येच गुंतवणूक करा असं सांगतील.
चांगले व्याज, करमुक्त गुंतवणूक, मॅच्युरिटीवर पूर्णपणे पैसे मिळत असे फायदे यात असतात. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हे एक उत्तम साधन आहे. मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षे आहे. परंतु, १५ वर्षांनंतरही तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तो कालवधी वाढवू शकतात. तुम्ही मुदतवाढ दिल्यास, तुमचा परतावा रॉकेटच्या वेगाने धावेल. फक्त ५००० रुपयांची सुरुवातीची गुंतवणूक थेट २६ लाख रुपयांपेक्षा जास्तची रक्कम तुम्हाला परत मिळेल.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तीन प्रकारची असते मॅच्युरिटी
हे ३ पर्याय समजून घेणे खूप महत्वाचे आहे. मुदतपूर्तीनंतर तुमचे पैसे काढा. दुसरे म्हणजे तुम्ही पैसे काढले नाही तरी व्याज चालूच राहील. तिसरे नवीन गुंतवणुकीसह ५ वर्षांसाठी परत मुदतवाढ दिली जाऊ शकते.
मॅच्युरिटीवर संपूर्ण पैसे काढल्यास
पीपीएफ खात्याच्या मॅच्युरिटी झाल्यावर तुम्ही जमा केलेली रक्कम व्याजासह काढून टाका. पीपीएफ खाते बंद झाल्यानंतर संपूर्ण पैसे तुमच्या खात्यात हस्तांतरित केले जातील. मॅच्युरिटीवर व्याजासह मिळणारे पैसे हे पूर्णपणे करमुक्त असतं. याशिवाय दरवर्षी १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकरची सूट मिळते. यामुळे संपूर्ण कार्यकाळात तुम्ही जमा केलेल्या पैशांवर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.
५ वर्षांसाठी PPF ची गुंतवणूक वाढवा
दुसरा पर्याय म्हणजे मॅच्युरिटी झाल्यानंतर परत गुंतवणुकीची मर्यादा वाढवणे. यात ५-५ वर्षांच्या कालावधीसाठी खात्याची मॅच्युरिटी वाढवण्याचा पर्याय देण्यात आलाय. जर तुम्हाला पुढील ५ वर्षांसाठी मुदतवाढ हवी असेल तर तुम्हाला पीपीएफ खात्याची मॅच्युरिटी पूर्ण होण्याआधी १ वर्ष आधी बँक किंवा पोस्ट ऑफिसला कळवावे लागेल. मॅच्युरिटीच्या वेळी प्री-मॅच्युअर पैसे काढण्याचा नियम लागू होत नाही आणि तुम्ही कधीही पैसे काढू शकता.
मॅच्युरिटी झाल्यानंतरही गुंतवणूक वाढवा
PPF खात्यातील तिसरा पर्याय, खाते मॅच्युअर झाल्यानंतर कार्यरत राहील. यामध्ये नव्या गुंतवणुकीची गरज भासणार नाही. मॅच्युरिटी आपोआप ५ वर्षांनी वाढेल. याच सर्वात मोठा फायदा असा होईल की, या संपूर्ण कालावधीत जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत राहील. यानंतर ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पुन्हा त्याच पद्धतीने मुदतवाढ देऊ शकतात.
५००० रुपयात मिळवा २६.६३ लाख रुपये
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफमध्ये सध्या ७.१% व्याज दिले जात आहे. व्याजाची वार्षिक गणना केली जाते. परंतु ते त्रैमासिक आधारावर ठरवले जाते. गेल्या काही काळापासून त्याच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे जर तुम्ही १५ किंवा २० वर्षे समान व्याजदराने गुंतवणूक केली तर वेगवेगळ्या रकमेवर मोठा पैसा तयार होईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.