सरकार नवीन वर्षात मध्यमवर्गीयांना आनंदाची बातमी देणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला RBI ने सलग पाचव्यांदा व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. परंतु सरकार जानेवारी-मार्च २०२४ साठी पीपीएफ, एनएससी इत्यादी छोट्या बचत योजनांवरील व्याजदर वाढवण्याचा विचार करत आहे. सरकारी सिक्योरिटीजच्या उत्पन्न पाहता छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे.(Latest News)
पीपीएफ, एनएससी इत्यादीसारख्या लहान बचत योजनांवरील व्याजदर आता बाजाराशी जोडलेले आहेत. यामुळे या योजनांवर देण्यात येणाऱ्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे, असं सुनील सिन्हा, मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ संचालक (पर्सनल फायनान्स), इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. लहान बचत योजनांच्या व्याजदरांवर निर्णय घेण्याआधी सरकार देशाच्या तरलता आणि चलनवाढीवरही लक्ष ठेवते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
म्हणजेच काय, सरकार PPF, NSC आणि KVP सह लहान बचत योजनांवरील व्याजदरांचे दर तिमाहीतील पुनरावलोकन करेल ते जाणून घेईल. सध्या लहान बचत योजनांवर ४ टक्के (पोस्ट ऑफिस सेव्हिंग डिपॉझिट) आणि ८.२ टक्के (ज्येष्ठ नागरिक बचत योजना) व्याजदर आहेत.
अल्पबचत योजनेत तीन श्रेणींचा समावेश
लहान बचत योजनेमध्ये बचत ठेव, सार्वजनिक सुरक्षा योजना आणि मासिक उत्पन्न योजना या ३ श्रेणींचा समावेश आहे. बचत ठेवींमध्ये १-३-वर्षांची FD आणि ५-वर्षांची RD चा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आणि किसान विकास पत्र (KVP) सारख्या बचत प्रमाणपत्रांचा देखील समावेश आहे.
सार्वजनिक सुरक्षा योजनांमध्ये PPF, सुकन्या समृद्धी खाते आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांचा समावेश होतो. मासिक उत्पन्न योजनेमध्ये मासिक उत्पन्न खाते समावेश आहे. दरम्यान सरकारने चालू ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ तिमाहीत PPF, सुकन्या समृद्धी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि पोस्ट ऑफिस FD सारख्या लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केवळ 5 वर्षांच्या आरडीच्या व्याजदरात ०.२० टक्के वाढ करण्यात आलीय
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.