

Pan Card Transaction : आधार कार्ड व पॅन कार्ड हे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रातील एक आहे. अशातच केंद्र सरकारने ३० मार्चला आधार-पॅन लिंकची तारीख वाढवण्यात आली असून ती ३० जूनपर्यंत करण्यात आली होती.
सरकारने पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे बंधनकरणे केले होते. परंतु, बहुतेक लोकांनी अजूनही पॅनला आधार कार्डशी लिंक केले नाही त्यामुळे १ जुलै २०२३ पासून पॅनकार्ड इनअॅक्टिव्ह झाले असले तरीही तुम्हाला यावरुन आर्थिक व्यवहार करता येतील.
2. हे आर्थिक व्यवहार करता येतील, पण
पॅन कार्ड निष्क्रिय झाले असल्यास तुम्हाला आर्थिक व्यवहार करता येतील. यावरुन आपल्याला TDS आणि TCS यांसारख्या गोष्टींवर सवलत मिळू शकते.
पॅन कार्ड निष्क्रिय असल्यास बँकेच्या मुदत ठेवींमधून व्याज उत्पन्न मिळत असल्यास, आर्थिक वर्षात आवर्ती ठेवींवरील एकूण व्याज रु. 40,000 मिळेल पण त्यावर TDS भरावा लागेल.
जर तुम्ही गुंतवणूक (Investment) केली असेल आणि त्यात तुम्हाला 5,000 पेक्षा जास्त रिटर्न मिळाले असतील तर तुम्हाला जास्त TDS भरावा लागेल.
तुम्हाला कोणताही ५० लाखांपेक्षा जास्त व्यवहार करायचा असेल किंवा मालमत्ता विकायची असेल तर त्यावरही तुम्हाला टीडीएस भरावा लागेल.
कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि १० लाखपेक्षा जास्त रक्कम असेल तर तुम्हाला अधिक TCS भरावे लागेल.
तुम्हाला पीएफ काढावयाचा असेल आणि तो ५०००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर TDS लागू होईल.
भाड्याने राहात असाल व तुमचे मासिक भाडे हे ५०००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावरही तुमचा टीडीएस कर आकारला जाईल.
जर तुम्ही १५००० पेक्षा जास्त कमिशन किंवा ब्रोकरेज पेमेंट मिळवत असाल तर तुम्हाला टीडीएस भरावा लागेल
पॅनकार्ड निष्क्रिय झाले असले तरीही तुम्हाला आर्थिक व्यवहार करता येईल पण त्यावर कर आकारण्यात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.