यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे.यूपीएससी परीक्षा देऊन सरकारी विभागात अधिकारी पदावर काम करण्याची अनेकांची इच्छा असतात. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी मेहनत आणि सातत्य या दोन्ही गोष्टींची गरज असते. असंच सातत्य परमिता मालाकार यांनी मिळवलं आहे. परमिता मालाकार यांनी सहाव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे.
परमिता यांनी १२ तासांची नोकरी करत यूपीएससी परीक्षेची तयार केली. त्यांनी सहाव्या प्रयत्नात यश मिळवले. परमिता मालाकार यांनी २०१२ मध्ये बीएससी (ऑनर्स) फिजिक्समध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी बीपीओमध्ये नोकरी केली. त्यानंतर परमिता यांनी कॉर्पोरेट नोकरी करण्याचा निर्णय घेतला. परमिता यांनी सुरुवातीला टिसीएस आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. (UPSC Success Story)
परमिता यांनी २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. त्यांनी टिसीएस कंपनीत नोकरी करत असतानाच यूपीएससी परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १२ तासांच्या नोकरीसोबत अभ्यास केला. त्यांना पहिल्या प्रयत्नान अपयश आले. सुरुवातील त्या निराश झाल्या. परंतु त्यानंतर त्यांनी हार मानली नाही. त्यांनी अनेक स्पर्धात्मक परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला.
परमिता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी ३० व्या वर्षी एलआयसी, बँक पीओ, रेल्वे, पश्चिम बंगाल लोक सेवा आयोग अशा अनेक परीक्षा देण्यास सुरुवात केली. २०२२ मध्ये परमिता यांनी यूपीएससीची प्रिलियम आणि मुख्य परीक्षा दिली. त्यात त्या पास झाल्या. २०२३ साली त्यांचे सिलेक्शन झाले. (UPSC Paramita Malakar Success Story)
परमिता यांना अनेकदा स्पर्धात्मक परिक्षेत अपयश आले. तरीही त्यांनी हार मानली नाही. परमिता यांनी अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. त्यांनी कोलत्ताच्या एका कोचिंग सेंटरमध्ये क्लासेस लावले. त्यांनी प्रत्येक आठवड्याला मॉक टेस्ट दिले. परमिता यांनी यूपीएससी २०२३ ऑल इंडिया ८१२ रँक मिळवण्यात यश मिळवले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.