Share Market Today:आज शेअर मार्केटची दमदार सुरुवात;निफ्टी शंभरीपार तर सेनसेक्सनेही गाठला उच्चांक

Share Market Opening Today: आज सकाळी शेअर मार्केटमध्ये सेनसेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला आहे.
Share Market Today
Share Market TodaySaam Tv
Published On

रोज सकाळी गुंतवणूकदारांचे लक्ष हे शेअर मार्केटकडे असते. आज सकाळी शेअर मार्केट उघडताच बाजारात निफ्टी आणि सेनसेक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. आज शेअर मार्केट उघडताच सेनसेक्स ३०० अंकाच्या वाढीसह व्यव्हार करत होती. तर निफ्तीदेखील १०० अंकाच्या वाढीसह व्यव्हार करत होती.

Share Market Today
Kisan Vikas Patra Scheme: ५ लाख रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; काय आहे किसान विकास पत्र योजना?

सकाळी सेनसेक्स २८९.१९ अंकाच्या वाढीसह ८२,३२१ वर व्यव्हार करत होता. तर निफ्टी ८६.९० अंकाच्या वाढीसह २५,२३८.८५ वर व्यव्हार करत होती.गेल्या अनेक दिवसांपासूनची भरपाई आज भरुन निघाल्याचे दिसत आहे.

काल BSE वर शेअर्सचे मार्केट कॅप २,६२,५६,०७९.१२ कोटी होती. त्यात आज वाढ झाली आहे. आज शेअर मार्केट उघडताच मार्केट कॅप ४,६४,३१,३४८.६९ कोटी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या भांडवलात तब्बल १.७५ कोटींचा वाढ झाली आहे.

Share Market Today
Kisan Vikas Patra Scheme: ५ लाख रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; काय आहे किसान विकास पत्र योजना?

सेन्सेक्समधील अनेक शेअर्सच्या व्यव्हाराता तेजी होती. बजाज फिनसर्व्हच्या शेअरमध्ये १.५ टक्क्यांनी वाढ झाली. त्याचसोबत टायटन,एचडीएफसी बँक, बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये १ टक्क्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सेनसेक्समधील ३० पैकी २४ शेअर्स आज तेजीत व्यव्हार करत होते.आयटी शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. यात टिसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा यांचे शेअर्स घसरले होते.

Share Market Today
Unified Pension Scheme: शिंदे सरकारचा मोठा निर्णय , केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळणार, महाराष्ट्र पहिलेच राज्य!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com