IAS Jayganesh: IAS होण्याची जिद्द! ६ वेळा UPSC मध्ये फेल, IB ची ऑफरही धुडकावली; पण आयएएसचं स्वप्न पूर्ण केलेच, यशोगाथा वाचाच

IAS JayGanesh Success Story: मेहनत आणि शिक्षण घेऊन प्रत्येक व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतं. अपयश हे प्रत्येकालाच येतं. परंतु अपयश येऊनही जो व्यक्ती पुन्हा प्रयत्न तोच यशाला गवसणी घालतो.
IAS JayGanesh
IAS JayGaneshSaam Tv
Published On

यशाला कोणताही शॉर्ट कट नसतात, असं म्हटलं जातं. कोणत्याही व्यक्तीला यश मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात.यूपीएससी परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अथक मेहनत घ्यावी लागते. अनेकदा अपयशदेखील येते. परंतु अपयशावर मात करुन जो व्यक्ती आपली मेहनत सुरु ठेवतो. त्यालाच यश गवसणी घालते. असंच यश आयएएस ऑफिसर जयगणेश यांना मिळाले.

जयगणेश हे आज आयएएस ऑफिसर आहे. त्यांचे बालपण अत्यंत गरीबीत गेले. जयगणेश यांनी यूपीएससीची परीक्षा दिली. त्यात ६ वेळा त्यांना अपयश आले आणि ते नापास झाले. परंतु त्यांचे प्रयत्न बघून त्यांना आयबीमध्ये नोकरीची ऑफर मिळाली. परंतु त्यांना आयएएस ऑफिसर बनायचे होते. त्यासाठी त्यांनी पुन्हा मेहनत केली. सातव्या प्रयत्ना जयगणेश हे १५६ रँक मिळवून आयएएस ऑफिसर झाले. (Success Story)

IAS JayGanesh
IAS Ayush Goyal : २८ लाखांची नोकरी सोडली, जिद्दीने UPSC ची तयारी, एका झटक्यात IAS झाला; आयुष गोयलची सक्सेस स्टोरी वाचाच

जयगणेश यांनी आपल्या गावी १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. जयगणेश यांनी ९१ टक्क्यांसह पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी मॅकेनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले.

कॉलेज करता करता त्यांना कॉलेजच्या जवळच २५०० रुपयांची नोकरी मिळवली. त्यानंतर त्यांना या नोकरीतून समाधान आणि पुरेसे पैसेदेखील मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी आयएएस ऑफिसर बनवण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. (IAS Officer JayGanesh Success Story)

IAS JayGanesh
MPSC Success Story: पहिलाच प्रयत्न,राज्यात प्रथम; धाराशिवच्या सुपुत्राची भरारी, 29 व्या वर्षी झाला उपजिल्हाधिकारी

जयगणेश यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षेत सहा वेळा अपयश आले. त्यानंतर त्यांना इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरी मिळाली. परंतु त्यांनी नोकरी करण्याचे सोडून पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सातव्यांदा परीक्षा दिली आणि पास झाले. त्यांनी आपल्या अथक परिश्रमामुळे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

IAS JayGanesh
Success Story: 8 हजारांच्या कर्जात सुरू केला बिझनेस, आज आहेत 800 कोटींच्या मालकीण, कोण आहेत मीना बिंद्रा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com