UPI Payment: पर्यटकांसाठी खुशखबर! नेपाळमध्ये करता येणार युपीआयद्वारे पेमेंट

UPI In Nepal: पर्यटकांसाठी आता एक खुशखबर आहे. नेपाळमध्ये देखील UPI द्वारे पेमेंट करताय येणार आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये आता UPI सेवा सुरू झाली आहे.
UPI Payment
UPI PaymentYandex
Published On

UPI Service In Nepal

नेपाळला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर (UPI In Nepal) आहे. आता त्यांना नेपाळमध्ये चलन विनिमयाची गरज भासणार नाही. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सांगितलं आहे की, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) म्हणजेच युपीआय आता शेजारील देश नेपाळमध्ये देखील उपलब्ध आहे. युपीआय वापरकर्ते QR कोड स्कॅन करून नेपाळी व्यापाऱ्यांना पेमेंट करू शकतात, असं त्यांनी अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. (latest marathi news)

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी सप्टेंबरमध्ये NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स (NIPL) आणि नेपाळमधील फोनपे पेमेंट सेवा यांच्यात एक करार झाला होता. या अंतर्गत नेपाळमध्ये युपीआयद्वारे पेमेंट सुरू झाले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेपाळमध्ये UPI सेवा सुरू

पहिल्या टप्प्यात भारतीय वापरकर्ते नेपाळमधील विविध व्यापारी दुकानांमध्ये जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर युपीआय पेमेंट करू शकतील. फोनपे ॲप नेटवर्कमध्ये समाविष्ट असलेले व्यापारी भारतीय ग्राहकांकडून युपीआय ​​पेमेंट घेऊ (UPI Payment) शकतात.

एनआयपीएलचे मुख्य कार्यकारी रितेश शुक्ला म्हणाले, हा उपक्रम केवळ डिजिटल पेमेंट क्षेत्रात नाविन्य आणण्याची आमची वचनबद्धता दर्शवत नाही, तर व्यापारासाठी नवीन मार्ग निर्माण करण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी आमचे समर्पण देखील (UPI Payment Update) दाखवतो.

UPI Payment
UPI Payment: परदेशात फिरण्यासाठी डॉलर घ्यायची गरज नाही; या देशांमध्ये UPI द्वारे करु शकणार पेमेंट

दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध

फोनपेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवास कुमार न्युज१८ सोबत बोलताना म्हणाले की, या क्रॉस-बॉर्डर पेमेंट सोल्यूशनमुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध, वाणिज्य आणि पर्यटनात लक्षणीय सुधारणा होईल, असा मला विश्वास (UPI Update) आहे.

भारतात दररोज लाखो लोक युपीआयद्वारे पेमेंट करतात. भारतीय वापरकर्ते नेपाळमधील कोणत्याही व्यापाऱ्यासोबत युपीआयद्वारे ऑनलाइन व्यवहार करू शकतील. जगातील अनेक देशांमध्ये UPI द्वारे पेमेंट सुरू झाले आहे. श्रीलंका, फ्रान्स, मालदीव यांसारख्या अनेक देशांमध्ये युपीआयद्वारे पेमेंट करता येते.

UPI Payment
UPI Payment: सरकार UPI बाबत मोठा निर्णय घेणार? Google Pay आणि PhonePe कंपन्यांचं टेन्शन वाढलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com