UPI Payment: सरकार UPI बाबत मोठा निर्णय घेणार? Google Pay आणि PhonePe कंपन्यांचं टेन्शन वाढलं

UPI Payment Plan: आजकाल सर्वजण डिजिटल पेमेंटचा वापर करतात. त्यासाठी वेगवेगळ्या अॅपचा वापर करतात. काही दिवसांपूर्वी आरबीआयने पेटीएम पेमेंट अॅपवर कारवाई केली. त्यानंतर आता सरकार भारतीय अॅपवर भर देणार आहे.
UPI Payment
UPI Payment Saam Tv
Published On

Government Make In India Plan:

देशात सध्या सर्वजण डिजिटल पेमेंटचा वापर करताना दिसत आहे. लोकांनी यूपीआय पेमेंट करण्यावर जास्त भर दिला आहे. यासाठी भारतीय अॅप्सचा वापर करावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. भारतीय अॅप्सचा वापर करुन लोकांना पेमेंट करावे यासाठी मेक इन इंडिया या संकल्पनेवर जास्त भर दिला जाणार आहे. (Latest News In Marathi)

आरबीआयने काही दिवसांपूर्वी पेटीएम पेमेंट अॅपवर (Paytm Payment App)कारवाई केली आहे. त्यामुळे देशातील यूपीआय पेमेंटचा वापर बंद करण्यात येईल असे सांगण्यात येत होते. परंतु देशातील यूपीआय पेमेंट बंद होणार नसल्याचे आता सांगण्यात आले आहे. यूपीआय पेमेंटसाठी अनेक अॅपचा वापर केला जातो.

पेटीएम पेमेंट्सच्या कारवाईनंतर गुगल पे (Google Pay) आणि फोन पे (PhonePe) वरील युजर्स वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे १५ ते २० टक्के टक्के फायदा होणार असल्याचे सांगण्या येत आहे. देशात यूपीआय पेमेंट्सचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. युपीआय पेमेंटसाठी सरकार भारतीय अॅप्सवर भर देताना दिसत आहे. त्यामुळे Make In India वर भर पडेल.

UPI Payment
Car Discounts: होंडाच्या कारवर मिळतोय १.२० लाखापर्यंत डिस्काउंट, फेब्रुवारी महिन्यात खास ऑफर

देशात फोन पे या अॅपचे सर्वाधिक युजर्स आहेत. BHIM अॅपचा वापर सर्वात कमी होत आहे. त्यामुळेच भीम अॅप जास्त लोकांनी वापरावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. लोकांना वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. जेणेकरुन लोकांना भीप पे अॅपचा वापर वाढवला पाहिजे.

UPI Payment
Disney Hotstar: नेटफ्लिक्सनंतर डिस्ने प्लस हॉटस्टारचा मोठा निर्णय; पासवर्ड शेअर करण्यासाठी द्यावे लागणार जास्त पैसे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com