Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Union Budget 2026 SHE Mart Scheme Annoucement: केंद्र सरकारने महिलांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. महिलांसाठी SHE Mart योजना सुरु करण्याची घोषणा निर्मला सितारामन यांनी केली आहे.
Union Budget 2026
Union Budget 2026Saam Tv
Published On
Summary

अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा

सुरु केली SHE Mart योजना

महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी योजना

अर्थसंकल्पात महिलांसाठी आणखी एक घोषणा करण्यात आली आहे. महिलांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. महिलांसाठी SHE Mart योजना सुरु केली आहे.या योजनेत महिलांना खूप फायदा होणार आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

Union Budget 2026
Budget : काय स्वस्त आणि काय महाग? स्मार्टफोनपासून ते होमलोन, या १० गोष्टींकडे लक्ष

अर्थसंकल्पात अजून एक घोषणा करण्यात आली आहे. लखपती दीदी योजना सुरु केली होती. या योजनेचा विस्तार केला जाणार आहे. या योजनेत महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. त्यानंतर आती ही नवीन SHE Mart योजना सुरु केली आहे. या योजनेत व्यवसाय स्थिर करण्यासाठी मदत मिळेल. याचसोबत कमी व्याजदराने कर्जदेखील मिळणार आहे.

काय आहे SHE Mart योजना? (What is SHE Mart Scheme)

महिलांना व्यवसाय करण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशातून ही योजना सुरु केली आहे. या योजनेत लघु आणि मध्यम उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज मिळते. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याची आणि त्यात वाढ करण्याची संधी मिळणार आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जर महिलांचा आर्थिक सहभाग वाढला तर कुटुंबाचेच उत्पन्न वाढणार आहे. त्याचसोबत अर्थव्यवस्थादेखील मजबूत होणार आहे. ही योजना बचत गट किंवा स्टार्टअप चालवणाऱ्या महिलांसाठी उपयोगी ठरणार आहे.

Union Budget 2026
LIC Scheme: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् महिन्याला १०,८८० रुपयांची पेन्शन मिळवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com