Online Payment Safety: ऑनलाइन शॉपिंग करताना फ्रॉड होण्याचा धोका वाटतोय? 'या' सोप्या टिप्सनं सुरक्षितपणे करा डिजिटल व्यवहार

Cyber Security India: ऑनलाइन खरेदी करताना वाढत्या डिजिटल फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित प्लॅटफॉर्म वापरणे, स्क्रीन शेअर टाळणे, फिशिंगपासून सावध राहणे आणि व्यवहारांवर लक्ष ठेवणे या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.
Digital Payment Safety Guide
Online Shopping Fraud Prevention Tipssaam tv
Published On
Summary

सुरक्षित प्लॅटफॉर्मवरूनच ऑनलाइन खरेदी करा आणि खोट्या लिंकपासून दूर रहा.

स्क्रीन शेअर, ओटीपी, पिन किंवा कार्ड तपशील कोणालाही देऊ नका.

व्यवहारांचे एसएमएस/अ‍ॅप अलर्ट्स सुरू ठेवा आणि संशयास्पद लिंकवर भेट देऊ नका.

भारतातील आर्थिक यंत्रणा विकसित होत आहे आणि ग्राहकांची व्यवहार करण्याची पद्धतही वेगाने बदलत आहे. युपीआय, कार्ड पेमेंट्सवर त्यांचा भर असून ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म व रिटेल आउटलेट्सनाही ते पसंती देत आहेत. दागिन्यांची खरेदी असो, किंवा जीवनशैलीत नवे बदल करणं असो, प्रवासाचे बुकिंग करणे असो किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची माहिती मिळवणे असो, ग्राहक सातत्याने ई- कॉमर्स आणि रिटेल पातळीवर सर्वोत्तम डील्सच्या शोधात असतात.

डिजिटल- फर्स्ट सुविधेला ग्राहकांची वाढती पसंती मिळत असून तत्काळ व्यवहार करण्याचा सोपेपणा त्यांच्या खर्च करण्याच्या मानसिकेतला आकार देत आहे. मूल्याच्या बाबतीत ईकॉमर्सचे वर्चस्व असून सप्टेंबर 2025 मधे एकूण क्रेडिट कार्ड खर्चाचा त्यातील वाटा 66.4 टक्के (स्त्रोत -ET BFSI.) होता. युपीआय, क्रेडिट कार्ड्स आणि डिजिटल वॉलेट्ससारख्या डिजिल पेमेंट्स पद्धतींचा वापर वाढत असून ग्राहकांनी ऑनलाइन व्यवहार करताना, विविध ऑफर्स आणि डील्सचा सर्वाधिक वापर करताना जागरूक राहणे महत्त्वाचे झाले आहे आणि तरच त्यांना सफाईदार पेमेंट पद्धतीचा आनंद घेता येईल.

Digital Payment Safety Guide
Chapati Vs Bhakri: भाकरी की चपाती, पचनासाठी काय योग्य? वाचा संपूर्ण माहिती

इंटरनॅशनल फ्रॉड अवेयरनेस वीकचा एक भाग म्हणून एसबीआय कार्ड, या भारतातील सर्वात मोठ्या प्युअर प्ले क्रेडिट कार्ड कंपनीने ग्राहकांना सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहाण्याची विनंती केली असून सहज व सुरक्षितपणे खरेदी करण्यासाठी सुरक्षेच्या काही टिप्स दिल्या आहेत.

1. केवळ विश्वासार्ह प्लॅटफॉर्मद्वारे खरेदी करा – कायम अधिकृत ब्रँड वेबसाइट्स आणि प्रतिष्ठित मार्केटप्लेसेसमधून खरेदी करा. सोशल मीडिया किंवा मेसेजिंग अ‍ॅप्सवरून शेयर केल्या जाणाऱ्या खोट्या वेबसाइट्सवरील अटॅचमेंट्स किंवा कोणत्याही लिंक्सवर क्लिक करणं टाळा, कारण त्या हमखास डिजिटल फसवणुकीचे मार्ग असतात.

2. स्क्रीन शेयरिंग फ्रॉडला प्रतिबंध करा – नागरिकांनी त्यांचा लॅपटॉप, डेस्कटॉप, मोबाइल फोन्सवरून अनोळखी व्यक्तीसह स्क्रीन शेयर करू नये. कोणतेही थर्ड- पार्टी अप्लिकेशन आणि एपीके फाइल्स तुमच्या उपकरणावर डाउनलोड करू नका, कारण त्यामुळे तुमची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती इतरांना मिळून फसवणुकीची शक्यता वाढते.

3. डील्स/ऑफर्सची खात्री करा – अवास्तविक सवलती, रिफंड नोटिफिकेशन्स आणि फसवणूक सदृश व्यवहार, विशेषतः महाग वस्तूंवरील सवलती यांपासून सावध कार. पेमेंट करण्यापूर्वी थेट ब्रँडशी संपर्क साधा.

4. रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करताना सावध राहा – एसएमएस, ईमेल्स किंवा कॉलद्वारे, लिंकवर क्लिक करून पॉइंट्स रिडीम करायला सांगणाऱ्यांची सत्यता तपासा तसेच वैयक्तिक/क्रेडिट कार्डची माहिती देणं टाळा.

5. व्यवहारांचे अलर्ट्स – रियल टाइममधे खर्च ट्रॅक करायचा असल्यास प्रत्येक व्यवहारासाठी एसएमएस आणि अ‍ॅप नोटिफिकेशन सुरू ठेवा. यामुळे कोणताही अनाधिकृत व्यवहार घडत असल्यास पटकन कळण्यास मदत होते.

6. फिशिंगच्या प्रयत्नांपासून सावध राहा – फिशिंग ईमेल्स, मेसेजेस आणि तुमचं अकाउंट रद्द ठरवण्यात आल्याच्या कॉल्सपासून तसेच तुमचे पॉइंट्स/ऑफर्स एक्सपायर होत आहेत किंवा खोटे डिलिव्हरी अ‍ॅपडेट्स यांपासून सावध धरा. अकाउंटच्या तपशीलांमधील बदल नेहमीच अधिकृत कस्टमर केयर रिप्रेझेंटिव्हकडून पडताळून घ्या. बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या कधीच गोपनीय माहिती (ओटीपी, सीव्हीव्ही, पिन, पासवर्ड इ.) किंवा मेसेजेस विचारत नाहीत.

Digital Payment Safety Guide
Palak Puri Tips: पुरी फुगतच नाही? खूप तेल पितात? पिठात घाला 'हा' पदार्थ, परफेक्ट पुऱ्यांचं सिक्रेट

7. तुमचे उपकरण आणि अ‍ॅप्स अपडेटेड ठेवा – नियमितपणे डिव्हाइस सॉफ्टवेयर अ‍पडेट केल्याने सुरक्षेतील त्रुटी दूर होण्यास मदत होते. मल्टी- फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवल्याने तसेच तुमचा फोन, ब्राउसर, पेमेंट्स अॅप्स अद्ययावत व्हर्जननुसार चालत असल्याची खात्री करा म्हणजे मालवेयरपासून सुरक्षित राहता येते. खात्री नसलेल्या लिंक्स किंवा सोर्सेसवरून मोबाइल अ‍ॅप्स कधीही डाउनलोड करू नका.

8. नेहमी दमदार पासवर्ड निवडा – अकाउंट पासवर्ड नियमितपणे अ‍पडेट करणे महत्त्वाचे असते. नेहमी दमदार आणि ई-मेल किंवा सोशल मीडिया पासर्वडपेक्षा वेगळा, अनोखा पासर्वड निवडा. पासर्वड कोणाला सांगू नका.

9. गोपनीय माहिती शेयर करू नका – नागरिकांनी कधीही आपल्या कार्डाचे तपशील पिन, ओटीपी किंवा सीव्हीव्ही इतर कोणासोबतही शेयर करू नये तसेच व्यवहार पुढे नेण्यापूर्वी कोणताही कॉल, ईमेल किंवा मेसेजची सत्यता पडताळून पाहा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तक्रार किंवा शंका विचारतना कधीही कार्डाचे तपशील किंवा फोन नंबर देऊ नका.

10. पेमेंट फ्रॉड्सपासून सावध राहा – जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे खात्री नसलेले पेमेंट आले किंवा तुमच्या अकाउंटमधे अशाप्रकारचा रिफंड जमा झाल्यास कोणतीही कार्यवाही करण्यापूर्वी खात्री करावी.

पेमेंट क्षेत्र सातत्याने विकसित होत आहे. सोयीस्करपणा आणि सावधगिरी यांचा मेळ घातला जाणे आवश्यक आहे. माहिती करून घेणे, व्यवहार पडताळून पाहाणे आणि पेमेंट करण्याच्या सुरक्षित पद्धतींचा अवलंब करणे यातून ग्राहकांना खरेदी करताना वेगवेगळ्या संधींचा योग्य लाभ करून घेता येतो. क्रेडिट कार्डचा योग्य वापर केल्यास चांगली सोय होते, सुरक्षा मिळते तसेच वेगवेगळे लाभ मिळतात. एसबीआय कार्ड कार्डधारकांना कोणत्याही प्लॅटफॉर्मद्वारे पेमेंट करताना सजग आणि सावध राहाण्याची विनंती करत आहे.

या सोप्या सूचनांचा अवलंब करून ग्राहकांना खरेदीचा मनसोक्त आनंद घेता येईल आणि सुरक्षितपणे व्यवहार करून त्यांच्या क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड्स व कॅशबॅकचा आनंद घेता येईल.

Digital Payment Safety Guide
Diabetes Patients Breakfast: डायबेटीजच्या रूग्णांनी नाश्ता कधी करावा? तज्ज्ञ सांगतात 'या' वेळेत खा, कंट्रोलमध्ये राहिल ब्लड शुगर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com