Sakshi Sunil Jadhav
भाकरी ज्वारी, बाजरी, नाचणी, रागी किंवा तांदळाच्या पिठापासून बनवली जाते. या धान्यांमध्ये विविध प्रकारचे खनिज, फायबर, आणि जीवनसत्त्वे असतात, जे गव्हाच्या पिठाच्या चपातीपेक्षा अधिक पोषणदायी ठरतात.
ज्वारी व बाजरीच्या भाकरीत फायबर मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे पचन सुधारतं आणि बराच वेळ भूक लागत नाही. चपातीच्या तुलनेत फायबर कंटेंट जवळजवळ १.५ पट जास्त असतो.
भाकरीमध्ये वापरली जाणारी बहुतेक धान्ये ग्लूटेन-फ्री असतात. त्यामुळे गहू किंवा ग्लूटेनची ऍलर्जी असणाऱ्या लोकांसाठी भाकरी हा अधिक सुरक्षित पर्याय आहे.
बाजरी आणि नाचणीत लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. ही खनिजे हाडांच्या आरोग्यासाठी आणि रक्तातील हिमोग्लोबिनसाठी उपयुक्त असतात.
भाकरीतील धान्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते. मधुमेही रुग्णांसाठी हे फायदेशीर ठरते.
गव्हाच्या चपातीत ग्लूटेन असल्याने ती थोडी हलकी व लवकर पचणारी असते. त्यामुळे लहान मुलं किंवा वृद्धांसाठी ती सोपी ठरते.
एक भाकरी साधारण 100 ते120 कॅलरी देते, तर एक चपाती 70 ते 90 कॅलरी देते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवायचं असल्यास प्रमाण महत्त्वाचं ठरतं.
भाकरी तयार करताना जर जास्त तेल किंवा तूप वापरलं, तर तिचं कॅलरी मूल्य वाढतं. सुक्या किंवा तव्यावर भाजलेल्या भाकऱ्या जास्त आरोग्यदायी ठरतात.
आहारतज्ज्ञ सांगतात आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा गहूऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी यांचा वापर करावा. यामुळे शरीराला सर्व आवश्यक पोषक मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.