Soft Dosa Tips: डोसा गोल होत नाही? तव्याला चिकटतो? मग या टिप्स वापरा, सॉफ्ट अन् झटपट होईल डोसा

Sakshi Sunil Jadhav

रोजच्या नाश्त्याचा मेन्यू

नाश्त्यासाठी रोज पोहे खाऊन कंटाळा आला, तर आपण डोसा तयार करतो. मात्र डोसा बनवताना अनेकांना अडथळे येतात.

Soft Dosa Tips | saam tv

डोसा बनवण्याच्या टिप्स

डोसा बनवताना बऱ्याच वेळा तो तव्याला चिकटतो, फुटतो किंवा आकाराने गोल होत नाही. पण काही सोप्या टिप्स वापरल्यास तुमचा डोसा झटपट, क्रिस्पी आणि परफेक्ट बनेल.

Soft Dosa Tips

तवा योग्य निवडा

डोसा बनवण्यासाठी कास्ट लोखंडी किंवा नॉन-स्टिक तवा वापरा. तवा जाडसर आणि गरम ठेवणे महत्त्वाचे आहे.

Soft Dosa Tips

तवा खूप गरम करू नका


अतिगरम तव्यावर डोसा घातल्यास तो चिकटतो. तव्यावर थोडं पाणी टाकून तपासा जर पाणी लगेच वाफ झालं तर तवा योग्य गरम आहे.

Soft Dosa Tips

तव्याला तेलाने चोळा


प्रत्येक डोशाच्या आधी तव्यावर कांद्याचा तुकडा किंवा तेलात भिजवलेला कापडाने हलकं तेल चोळा. यामुळे डोसा चिकटत नाही.

Soft Dosa Tips

बॅटरचा घट्टपणा तपासा


खूप पातळ किंवा खूप घट्ट बॅटर नको. दह्यासारखं थोडं गाढ असावं. बॅटर ८ ते १० तास झाकून ठेवा. चांगलं फर्मेंट झालं की डोसा मऊ आणि फुलका होतो.

Soft Dosa Tips

तवा ओला ठेवू नका


तवा ओला असेल तर डोसा व्यवस्थित पसरत नाही. डोसा घालण्याआधी तवा कोरडा असावा. मोठ्या गोलाकार हालचालीत हलक्या हाताने बॅटर पसरवा. जोराने पसरवल्यास डोसा फाटतो.

Soft Dosa Tips

तेल योग्य प्रमाणात वापरा


खूप तेल टाकल्यास डोसा कुरकुरीत न होता मऊ राहतो. एक-दोन थेंब पुरेसे आहेत.

Soft Dosa Tips

डोसा योग्य वेळेत उलटा


वरची बाजू कोरडी दिसल्यावरच उलटा करा. लवकर उलटल्यास तो फुटतो.

Soft Dosa Tips

NEXT: १८ वर्षांचे तरुण गुगलवर काय सगळ्यात जास्त सर्च करतात? उत्तर जाणून व्हाल थक्क

What 18-Year-Olds in India Search
येथे क्लिक करा