Sakshi Sunil Jadhav
आजच्या जनरेशन Z साठी गुगल म्हणजे माहितीचा सर्वात जवळचा मित्र आहे. विशेषतः १८ वर्षांचे कॉलेजला जाणारे तरुण दररोज काही ना काही नवीन जाणून घेण्यासाठी गुगलवर सर्च करत असतात.
करिअर, फॅशन, फिटनेस, ट्रॅव्हल या सर्व गोष्टी आता त्यांच्या रोजच्या सवयीचा भाग झाल्या आहेत. चला पाहूया सध्या भारतातील १८ वर्षांच्या मुलांमध्ये कोणते सर्च ट्रेंड्स सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहेत
१२ वी नंतर कोणता कोर्स घ्यावा? इंजिनिअरिंग, बीए, बीकॉम की डिझाईन? असे प्रश्न तरुण गुगलला जास्त विचारतात.
UPSC, MPSC, SSC, रेल्वे, पोलीस भरती अशा नोकऱ्यांविषयी माहिती घेण्यासाठी तरुण सातत्याने सर्च करतात.
कॉलेज सुरू होताच मुलं स्टायलिश दिसण्यासाठी गुगलवर Best hairstyle for boys, कॉलेज ट्रेंडी लूक्स असे कीवड्स सर्च करतात. कारण फॅशन आता व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
जिममध्ये जाण्यापूर्वी किंवा घरच्या घरी व्यायाम सुरू करण्यासाठी गुगल त्यांचा फिटनेस कोच ठरतो. त्यामध्ये abs वर्कआउट, होम जीम सेटअप हे कीवर्ड तरुणांमध्ये ट्रेंडिंग आहेत.
“Top colleges near me”, “cut off list 2025”, “college fest ideas” या सर्चेसवरून विद्यार्थ्यांचा उत्साह आणि कॉलेज जीवनाबद्दलची उत्सुकता स्पष्ट दिसते.
कॉलेज कॅन्टीन आणि मॅगी ही कायम असतेच. तरुण easy maggi recipes, प्रोटीन ब्रेकफास्ट, बजेट फूड पुणे-मुंबई अशा सर्चमधून सोपी आणि चविष्ठ जेवणं शोधतात.
“Lonavala trip”, “Goa plan under 5000”, “bike ride near Mumbai” अशा सर्चमधून दिसतं की ट्रॅव्हल आता फक्त हौस नाही, तर तरुणांसाठी ‘रिलॅक्सेशन थेरपी’ बनली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.