Pawna Lake Tourism: बजेट कमी आहे? 'या' ठिकाणी करा ट्रीप, कुल्लू मनाली विसराल

Sakshi Sunil Jadhav

बजेट पिकनिक प्लान

लोणावळ्यातील पवना लेक कॅम्पिंग हे पर्यटकांसाठी हिवाळ्यातील सर्वात आकर्षक स्पॉट आहे. हिरवा गार निसर्ग, थंड हवा आणि तलावकिनाऱ्याचं सौंदर्य अनुभवण्यासाठी हा हंगाम अगदी योग्य असतो.

Pawna Lake camping | google

प्लानची संपूर्ण माहिती

पुढे आपण याच दिवसात मित्रांसोबत कॅम्पिंग ट्रिपसाठी आवश्यक माहिती, बजेट आणि जवळच्या पर्यटनस्थळांची यादी जाणून घेणार आहेत.

Lonavala camping | google

पवना लेकचे अंतर

पवना लेक हे लोणावळ्यापासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे. मुंबईहून सुमारे 120 किमी आणि पुण्याहून 60 किमी अंतरावर. गाडी किंवा ट्रेनने सहज पोहोचता येतं.

Pawna Lake trip | saam tv

भेट देण्याचा सर्वोत्तम काळ

हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान हा कॅम्पिंगसाठी सर्वात योग्य काळ आहे. या काळात हवामान थंड, प्रसन्न आणि फोटोग्राफीसाठी उत्तम असतं.

winter camping Maharashtra | saam tv

कॅम्पिंगची सुविधा

तुम्हाला येथे लेक व्ह्यू टेंट, बोनफायर, बार्बेक्यू, म्युझिक नाईट आणि ताऱ्यांखाली डिनर अशा सुविधा उपलब्ध असतात. काही ठिकाणी लक्झरी टेंट्स आणि खासगी बोनफायरची सुविधाही दिली जाते.

Pawna camping budget | saam tv

अन्न आणि पेय

शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण दिलं जातं. नाश्ता, संध्याकाळचा चहा, आणि रात्रीचं जेवण हे पॅकेजमध्ये असतं.

luxury tents Pawna | google

अंदाजे बजेट

साधारण कॅम्पिंग पॅकेज प्रति व्यक्ती ₹1000 ते ₹1800 पर्यंत असतं. लक्झरी टेंटसाठी किंमत ₹2500–₹3500 दरम्यान असते.

Lonavala weekend trip | saam tv

जवळची पर्यटनस्थळे

टायगर पॉइंट, भुशी डॅम, लायन्स पॉइंट, तुंग किल्ला, टिकोना किल्ला आणि लोणावळा मार्केट या ठिकाणी भेट देता येते.

Lonavala weekend trip | google

प्रवास करण्याची साधने

पवना लेकपर्यंत स्वतःची कार, बाईक किंवा कॅबने जाणं सोयीस्कर आहे. सार्वजनिक वाहतूक थोडी मर्यादित आहे.

Pune weekend destination | saam tv

काय घेऊन जावं?

गरम कपडे, स्पोर्ट शूज, टॉर्च, पॉवर बँक, आणि आवश्यक औषधं सोबत ठेवा. थंड हवेमुळे ब्लँकेट किंवा शॉलही घ्या.

Pune weekend destination | saam tv

NEXT: वरण भातासोबत करा रताळ्याचे कुरकुरीत काप; वाचा सोपी रेसिपी

Ratalyache Kaap Recipe
येथे क्लिक करा