10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतात हे 5G फोन, पाहा लिस्ट

hones Under 10000: आज आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत जे 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्ससह येतात.
Best 5g Mobile Phones Under 10000
Best 5g Mobile Phones Under 10000Saam Tv

Best 5g Mobile Phones Under 10000:

जर तुम्ही 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत जे 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्ससह येतात. या फोनमध्ये Nokia, Poco, Lava आणि itel सारख्या ब्रँडचे स्मार्टफोन समाविष्ट आहेत.

हे सर्व फोन ऑनलाइन शॉपिंग साइट Amazon आणि Flipkart वर उपलब्ध आहेत. येथून तुम्ही हे फोन खरेदी करू शकतात. चला तर पाहूस अपूर्ण लिस्ट...  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Best 5g Mobile Phones Under 10000
50 इंचाचा Smart TV मिळतोय अर्ध्या किंमतीत, 25000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

itel P55 5G

सर्वात आधी Itel P55 5G बद्दल बोलू, याच्या 6GB/128GB व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये आहे. मात्र ग्राहकांना हा फोन Amazon India वरून 500 रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह मिळू शकतो. यात MediaTek Dimension 6080 चिपसेट आहे. फोटोग्राफीसाठी यात 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Nokia G42 5G

ग्राहकांना Nokia G42 5G स्मार्टफोन देखील 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. याच्या 6GB/128GB व्हेरिएंटची किंमत फक्त 9,999 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना 2 जीबी व्हर्च्युअल रॅमचा सपोर्टही मिळेल. या फोनमध्ये तुम्हाला Octa core Snapdragon 480 Plus 5G प्रोसेसर मिळेल.

Best 5g Mobile Phones Under 10000
Ola Solo: जबरदस्त! रायडरशिवाय धावते ही इलेक्ट्रिक स्कूटर, Ola घेऊन येत आहे जगातील पहिली ऑटोनॉमस EV

Poco M6 5G

या लिस्टमध्ये Poco M6 5G चाही समावेश आहे. याचा 4GB/128GB व्हेरिएंटची फ्लिपकार्टवरून फक्त 9,499 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. कंपनीने या डिवाइस मध्ये MediaTek Dimension 6100 Plus प्रोसेसर दिला आहे. तसेच जर आपण कॅमेरा सेटअपबद्दल बोललो तर यात 50MP AI ड्युअल कॅमेरा सपोर्ट ग्राहकांना मिळेल. हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो.

Poco M6 Pro 5G

याशिवाय तुम्ही 10,000 रुपयांपर्यंतच्या किमतीत Poco M6 Pro 5G देखील खरेदी करू शकता. याच्या 4GB/128GB व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. ज्यामध्ये फोटोग्राफीसाठी 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. Poco च्या या बजेट फोममध्ये यूजर्सना 5000mAh ची दमदार बॅटरी मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com