Ola Solo: जबरदस्त! रायडरशिवाय धावते ही इलेक्ट्रिक स्कूटर, Ola घेऊन येत आहे जगातील पहिली ऑटोनॉमस EV

EV News: ओला इलेक्ट्रिकने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा स्कूटरचा व्हिडिओ शेअर केला, ज्याला पाहून नेटकऱ्यांना वाटले की कंपनी लोकांना एप्रिल फूल करत आहे. मात्र हे तसं नाही आहे.
Ola Solo
Ola SoloSaam Tv

Ola Solo News:

ओला इलेक्ट्रिकने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा स्कूटरचा व्हिडिओ शेअर केला, ज्याला पाहून नेटकऱ्यांना वाटले की कंपनी लोकांना एप्रिल फूल करत आहे. मात्र हे तसं नाही आहे. ओलाने व्हिडिओद्वारे जगातील पहिली ऑटोनॉमस इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे.

कंपनीने नवीन मॉडेलला ओला सोलो असे नाव दिले आहे. ओला ही अशा प्रकारची स्कूटर बनवणारी पहिली कंपनी ठरली आहे. कारण भारतात अनेक दुचाकी कंपन्या इतक्या वर्षांपासून स्कूटर बनवत आहेत, पण या प्रकारची स्कूटर कोणीही बनवली नाही. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ola Solo
Skoda Superb: सेफ्टीत बेस्ट अन् स्टाईलमध्ये ग्रेट, भारतीय बाजारात पुन्हा घेतली 'या' कारने एन्ट्री; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

यात काय आहे खास?

पहिल्यांदा ओला सोलो 1 एप्रिल रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसली. सुरुवातीला असे वाटले की कदाचित कंपनी एप्रिल फूल बनवत आहे, मात्र तसं झाले नाही. कारण ते वर्किंग प्रोटोटाइप असल्याचे दिसून आले. भावीश अग्रवाल यांनी ही पोस्ट त्यांच्या एक्स हँडलवर अपलोड केली. कंपनीचा दावा आहे की सोलो पूर्णपणे होममेड असेल.  (Latest Marathi News)

Ola Solo फीचर्स

कंपनीचा दावा आहे की, Ola Solo मध्ये QUICKIE.AI आहे, जे झटपट निर्णय घेण्यास सक्षम आहे. शिवाय यात एक इन-हाउस विकसित LMAO9000 चिप आहे, जी रस्त्यांवर सहजपणे नेव्हिगेट करण्यासाठी रिअल-टाइम ट्रॅफिक डेटाचे विश्लेषण करते.

Ola Solo
Flipkart Big Bachat Sale: 64MP कॅमेरा, 8GB रॅम; 14,000 रुपयांनी स्वस्त झाला Realme चा सर्वाधिक विक्री होणार 5G स्मार्टफोन

22 भाषांना करणार सपोर्ट

नवीन ओला सोलो स्कूटर Krutrim voice-enabled AI तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल आणि 22 भाषांना सपोर्ट करेल. यात ऑटोनॉमस क्षमता वाढवण्यासाठी JU-Guard नावाचा एक इन-हाउस विकसित ॲडॉप्टिव्ह अल्गोरिदम आहे, जो आरामदायी राइड देईल आणि खड्डे आणि स्पीड ब्रेकरची देखील काळजी घेईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com