Realme GT 5G
Realme GT 5GSaam Tv

Flipkart Big Bachat Sale: 64MP कॅमेरा, 8GB रॅम; 14,000 रुपयांनी स्वस्त झाला Realme चा सर्वाधिक विक्री होणार 5G स्मार्टफोन

Realme GT 5G Price in Flipkart Big Bachat Sale: जर तुम्ही कमी किंमतीत चांगला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Flipkart Big Bachat Sale 1st to 7th April 2024:

जर तुम्ही कमी किंमतीत चांगला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Realme चा 64MP कॅमेरा स्मार्टफोन Flipkart च्या Big Bachat Days सेलमध्ये 14,000 रुपयांच्या डिस्काउंटवर विकला जात आहे.

ही सूट Realme GT 5G स्मार्टफोनवर दिली जात आहे. या फोनमध्ये तुम्हाला अनेक जबरदस्त फीचर्स पाहायला मिळतील. फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. या फोनवर नेमकी काय आहे ऑफर, किती आहे याची किंमत? याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ... (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Realme GT 5G
नवीन Kia Seltos भारतात लॉन्च, जबरदस्त लूकसह दमदार आहेत फीचर्स; Hyundai Creta ला देणार टक्कर

Realme GT 5G वर काय आहे ऑफर?

Flipkart Realme GT 5G फोन 14,000 रुपयांनी स्वस्त विकला जात आहे. हा फोन कंपनीने 37,000 रुपयांना लॉन्च केला होता. जो आता ग्राहकांना 23,999 रुपयांना खरेदी करता येईल. फोनवर बँक ऑफर अंतर्गत ग्राहकांना अतिरिक्त बचतही करता येईल. तुम्ही Flipkart AXIS बँक कार्डने हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल.

यातच जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल तर तुम्हाला 20,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळेल. ही सवलत तुमच्या जुन्या फोनची कंडिशन कशी आहे, यावर अवलंबून असेल.

Realme GT 5G
43 इंचाचा मोठा स्मार्ट टीव्ही 15 हजार पेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी, मिळत आहे जबरदस्त ऑफर

Realme GT 5G स्पेसिकेशन (Realme GT 5G Specification)

Realme GT 5G मध्ये 6.43-इंच फुल-एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 20:9 आस्पेक्ट रेशो आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटसह 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज यात मिळतो.

हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो, ज्यामध्ये 64MP Sony IMX682 प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा मिळतो. समोर 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. इतर फीचर्समध्ये 65W सुपरडार्ट चार्ज फास्ट चार्जिंगसह 4,500 mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि USB टाइप-सी मिळते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com