Tax Calculator: नवीन की जुनी करप्रणाली; टॅक्स कॅल्क्युलेटरने काही सेकंदात मिळेल उत्तर, कसा वापर करायचा?

Tax Calculator For ITR Filling: आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्ही टॅक्स कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुमचा किती कर जाणार याची माहिती मिळवू शकतात.
Tax Calculator
Tax CalculatorSaam Tv
Published On

आयटीआर फाइल करण्यास आता सुरुवात झाली आहे. आयटीआर भरताना विशेष काळजी घ्यायची असते. आयटीआर फाइल करताना तुमचा किती टॅक्स कट होणार यासाठी टॅक्स कॅल्क्युलेटर सुरु केले आहे. त्यामुळे आयकर फाइल करताना कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आयटीआर फाइल करु शकतात. आयकर विभागाने हे नवीन टॅक्स कॅल्क्युलेटर टूल सुरु केले आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार जुनी करप्रणाली की नवीन करप्रणाली कोणती चांगली आहे. कोणत्या करप्रणालीत किती टॅक्स द्यावा लागणार याबाबत माहिती मिळणार आहे.

Tax Calculator
Tax: १२ लाखांचं उत्पन्न टॅक्स फ्री; पण पगार वाढला तर काय? किती भरावा लागणार कर?

टॅक्स कॅलक्युलेटर कुठे आहे?

टॅक्स कॅल्क्युलेटर तुम्हाला आयकर विभागाच्या पोर्टलवरच उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी लॉग इन करायचे आहे. त्यानंतर Tax Tools सेक्शनमध्ये जा. यानंतर तुम्हाला सामान्य टॅक्स कॅलक्युलेटर आणि Old vs New Tax Regime कॅलक्युसेटर असा ऑप्शन मिळणार आहे. या कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्हाला किती टॅक्स भरावा लागणार याबाबत सर्व माहिती मिळणार आहे.

टॅक्स कॅलक्युलेटरचा वापर कसा करायचा?

तुम्हाला सर्वात आधी टॅक्स कॅल्क्युलेटरवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर काही महत्त्वाची माहिती भरायची आहे. यानंतर करदात्यांची श्रेणी, वय, रहिवासी प्रमाणपत्र ही माहिती भरायची आहे. यानंतर टॅक्सेबल इन्कमची रक्कम भरा. यानंतर टॅक्स कॅलक्युलेटर स्वतः तुमची सर्व रक्कम भरुन टॅक्सची रक्कम सांगणार आहे.

या गोष्टींवर लक्ष द्या

जुन्या करप्रणालीनुसार ५ लाख किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नाहीये.

नवीन टॅक्स सिस्टीममध्ये ही मर्यादा ७ लाख रुपये आहे.

यानंतर बजेट २०२५ मध्ये ही सूट वाढवून १२ लाख करण्यात आली. त्यामुळे १२ लाखांच्या उत्पन्नावर तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाहीये.

यानंतर टॅक्स कॅलक्युलेटर सरचार्ज आणि ४ टक्के हेल्थ एज्युकेशन सेसमध्ये जोडले जाते.

यानंतर शेवटी स्क्रिनवर टॅक्स लायबलिटी दिसते.

Tax Calculator
ITR Filling 2025: वेळ आणि पैसे दोन्ही वाचवा, CA शिवाय घरबसल्या फाइल करा ITR, सोपी प्रोसेस वाचा

नवीन की जुनी कोणती करप्रणाली चांगली?

टॅक्स कॅलक्युलेटर तुम्हाला नवीन की जुनी कोणती करप्रणाली चांगली हे सांगण्यासदेखील मदत करेन. नवीन टॅक्स स्लॅबमध्ये जरी १२ लाखांच्या उत्पन्नावर कर लागत नसला तरी गुंतवणूक किंवा खर्चावर टॅक्स सूट मिळत नाही. तर दुसरीकडे, जुन्या करप्रणाली टॅक्स रेट जास्त असला तरीही 80D,80C, HRA अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळते.

Tax Calculator
Income Tax Refund: सरकारची करदात्यांना खुशखबर! आता लवकर जमा होणार रिफंड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com