Share Market today : मतमोजणीच्या काही तासांतच शेअर बाजारात मोठा भूकंप; सेन्सेक्स आपटला, निफ्टीतही मोठी घसरण

Share Market today update : लोकसभा निवडणुकीच्या कलाचा शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. शेअर बाजारात आज मंगळवारी मोठी पडझड पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे.
मतमोजणीच्या काही तासांतच शेअर बाजारात मोठा भूकंप; सेन्सेक्स आपटला, निफ्टीतही मोठी घसरण
Share Market Saam Tv

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीचे सुरुवाती कल हाती आली आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलाचा परिणाम शेअर बाजारावरही पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील व्यवहार सुरु होताच सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारात सेन्सेक्स २००० अंकांनी आपटला. तर निफ्टी ६०० अंकांनी घसरला आहे.

शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात लाल चिन्हातून झाली आहे. लोकसभेच्या निकालाच्या दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे. शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतवणूकादारांना मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी ऐतिहासिक उंची गाठली होती.

मतमोजणीच्या काही तासांतच शेअर बाजारात मोठा भूकंप; सेन्सेक्स आपटला, निफ्टीतही मोठी घसरण
Business News : निकालाच्या दिवशीच महागाईचा भडका; जीवनावश्यक वस्तू महागल्या, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

बँक निफ्टी सोमवारी पहिल्यांदा ५०००० अंकांनी पार गेला होता. त्यानंतर आज बँक निफ्टी २.१७ टक्क्यांनी घसरला. शनिवारी अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली होती. आज अदानी ग्रुपच्या शेअरचा व्यवहार लाल चिन्हात सुरु आहे. अदानी पॉवरच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळत आहे.

मतमोजणीच्या काही तासांतच शेअर बाजारात मोठा भूकंप; सेन्सेक्स आपटला, निफ्टीतही मोठी घसरण
Dal-Rice Prices Increase : गरिबाच्या ताटातील वरण भातासह पालेभाज्याही महागला; वाचा वाढलेल्या किंमती

मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर देखील लाल चिन्हात व्यवहार सुरु आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये ३.३७ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळत आहे. रेल्वेच्या शेअरमध्येही घसरण पाहायला मिळत आहे. IRCTC, RVNL, IRFC च्या शेअरमध्ये घसरण दिसत आहे. एसबीआयच्या शेअरमध्येही घसरण दिसत आहे.

दरम्यान, लोकसभेच्या मतमोजणीच्या दिवशी गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये घसरण झाली आहे. काल बीएसईचे सर्व शेअरचे मार्केट कॅप 4,25,91,511.54 कोटी होते. त्यानंतर आज ४ जून रोजी मार्केट कॅप 4,15,59,174.70 कोटी रुपयांवर आली आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भांडवलात 10,32,336.84 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com