Stock Market Today : शेअर बाजाराला काल मिळाली झळाली, आजही मिळाले मोठे संकेत; काही तासांत स्पष्ट होणार

Share Market News : लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात काल तेजी पाहायला मिळाली. तर त्यानंतर आज शेअर बाजारात काय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
शेअर बाजाराला काल मिळाली झळाली, आजही मिळाले मोठे संकेत; काही तासांत स्पष्ट होणार
Stock Market HighSaam Tv

नवी दिल्ली : देशातील लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचे सुरुवातीचे कल देखील हाती आली आहेत. लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्येही मोठा उत्साह पाहायाला मिळत आहे. शेअर बाजारात काल चांगली झळाली पाहायला मिळाली. त्यानंतर आज मंगळवारी देखील शेअर बाजाराविषयी मोठे संकेत मिळाले आहेत. आज मंगळवारी शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी तेजी पाहायला मिळू शकते, अंदाज अनेकांनी वर्तवला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात काल तेजी पाहायला मिळाली. तर त्यानंतर आज शेअर बाजारात काय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

शेअर बाजाराला काल मिळाली झळाली, आजही मिळाले मोठे संकेत; काही तासांत स्पष्ट होणार
Lok Sabha Election Results : लोकसभा निवडणुकीचा आज निकाल, दिग्गजांचं भवितव्य पणाला; महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला?

शेअर बाजारात सोमवारी मोठी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीने ऐतिहासिक उंची गाठली. लोकसभेच्या निकालाआधी एक्झिट पोलचे अंदाज समोर आल्यानंतर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर आज देखील सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकभा निवडणुकीच्या निकालाआधीच सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ३० शेअर सेन्सेक्सचा इंडेक्स २००० हजार अंकांनी उसळी घेऊन व्यवहाराला सुरुवात झाली होती. दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्सने ऐतिहासिक उंची गाठली. काल व्यवहारानंतर बीएसई सेन्सेक्समध्ये २५०७.४७ अंकांनी म्हणजे ३.३९ टक्क्यांनी उसळी घेतली होती. त्यानंतर ७६,४६८.७८ पातळीवर बंद झाला.

शेअर बाजाराला काल मिळाली झळाली, आजही मिळाले मोठे संकेत; काही तासांत स्पष्ट होणार
Congress News : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा टास्कफोर्स, पटोलेही ठेवणार लक्ष

सेन्सेक्ससारखा नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीच्या व्यवहाराला ६०० अंकाच्या तेजीसह सुरुवात झाली होती. व्यवहार सुरु झाल्यानतंर निफ्टीने काही वेळात ऐतिहासिक उंची गाठली. निफ्टी २३,२६३.९० पातळीवर पोहोचला. शेअर बाजार बंद झाल्यावर निफ्टीमध्ये ३.२५ टक्क्यांनी आघाडी पाहायला मिळाली. बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांनी १२ लाख कोटींची कमाई केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com