Shubhmangal Vivah Yojana: लेकीच्या लग्नातलं खर्चाचं टेन्शन मिटलं; शुभमंगल योजनेतून विवाहासाठी सरकार देणार पैसे

Shubhmangal Vivah Yojana: प्रत्येक संस्थेला एकावेळी कमीतकमी ५ आणि जास्तीत जास्त १०० विवाहाची अट आहे.
Shubhmangal Vivah Yojana
Shubhmangal Vivah YojanaSaam TV
Published On: 

Shubhmangal Vivah Yojana:

लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील खास क्षण असतो. लग्न समारंभात मोठी धामधूम आणि गाजावाजा सुरू असतो. लग्नामध्ये मोठा खर्चही होतो. येणाऱ्या सर्व पाहुण्यांची उठबस करावी लागते. महागडे कपडे, दागिने अशा सर्व गोष्टींवर होत असलेल्या खर्चामुळे मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींवर कर्ज होतं. गरिब घरातील मुलींची ही अडचण लक्षात घेता सराकरने शुभमंगल विवाह योजनेची सुरुवातल केलीये.

Shubhmangal Vivah Yojana
PM Kisan Yojna: पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता लवकरच, मात्र 'या' शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ

या योजनेमध्ये ज्या गरजू मुली आहेत त्यांना अनुदान दिले जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचं वय १८ वर्षे पूर्ण असावं. यामध्ये उत्पन्नाचीही अट देण्यात आली आहे. सदर कुटुंबाचे उत्तपन्न १ लाखांपेक्ष कमी असावे. तेव्हा शुभमंगल विवाह योजनेचा लाभ घेता येतो.

आजही बऱ्याच ठिकाणी लग्नामध्ये मुलीकडच्या व्यक्तींना घरातील संसार मुलीसोबत खरेदी करून पाठवला जातो. यासह आलेल्या सर्व पाहुण्यांचे अदरातिथ्य करावे लागते. मोठ्या बस्त्यापासून सर्वच छोट्या मोठ्या गोष्टींसाठी पैसे खर्च करावे लागतात. या खर्चाचा काही ताळमेळ राहत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींसाठीच सरकारने ही योजना सुरू केलीये. प्रत्येक संस्थेला एकावेळी कमीतकमी ५ आणि जास्तीत जास्त १०० विवाहांची अट आहे.

मुलीच्या लग्नासाठीची ही योजना फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादीत आहे. सामुहीक विवाह सोहळा घेणाऱ्या संस्था देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये प्रत्येक जोडप्यामागे संस्थेला २ हजार रुपये दिले जातात. यासाठी संस्थेला देखील काही अटी घालण्यात आल्यात.

शुभमंगल विवाह योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्या त्या विवाह संस्थेतील व्यक्तींना सर्व विवाहांची नोंद करावी लागते. एक महिना आधी नोंदणी झालेल्या सर्व जोडप्यांची कागदपत्रे योजनेशी संबंधित ऑफिसमध्ये जमा करावी लागतात. त्यासह विवाह सोहळ्यात सहभाग घेतलेल्या जोडप्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करावा लागतो. हा व्हिडीओ आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.

Shubhmangal Vivah Yojana
#shorts : PM Mudra Yojna : कोणतेही तारण न ठेवता मिळवा लाखो रूपयांचे कर्ज...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.