Share Market Update: शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत; सोन्यालाही मिळाली झळाली, कारण काय?

Share Market Update News: शेअर बाजारात सेन्सेक्स १३८४ अंकानी उसळी घेत ६८, ८६५ अंकावर बंद झाला. तर निफ्टी २०,६८६ अंकावर बंद झाला. त्यानंतर मंगळवारीही सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळाली.
Share Market
Share MarketSaam Tv
Published On

Gold-Silver Price Today:

देशातील मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत गाठत काँग्रेसचा पराभव केला. या निवडणुकीत भाजपने मुंसडी मारल्यानंतर शेअर बाजार तुफान तेजी पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोमवारी शेअर बाजारात सेन्सेक्स १३८४ अंकानी उसळी घेत ६८, ८६५ अंकावर बंद झाला. तर निफ्टी २०,६८६ अंकावर बंद झाला. त्यानंतर मंगळवारीही सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळाली. (Latest Marathi News)

मीडिया वृत्तानुसार, शेअर बाजारात मंगळवारी सेन्सेक्स ६९ हजार पार पोहोचला. तर दुसरीकडे आज सोन्यालाही झळाळी मिळाली. सोमवारी दुपारी सोन्याची किंमत ६३,८०५ प्रति १० ग्रॅम होती. मात्र, काही वेळानंतर सोन्याचा भाव घसरल्याचे दिसून आलं.

Share Market
Vivah Anudan Yojana : मुलीच्या लग्नासाठी सरकारकडून मिळतायत पैसे; या योजनेचा घ्या लाभ

निवडणूक निकालानंतर सोमवारी शेअर बाजारात आणि सराफा बाजार अशा दोन्ही ठिकाणी तेजी पाहायला मिळाली.

सोन्याचे भावात वाढ का होत आहे?

जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता असते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे आकर्षित होतात. सोन्याला नेहमी सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. २०२३ सालात सोन्याच्या भावात तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याच्या भावात वाढ होण्यामागे रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचं कारणही समजू शकतो.

युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता वाढू लागली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य देतात. अमेरिकेतील गुंतवणूकदारही महागाईमुळे गुंतवणुकीसाठी सोन्याला प्राधान्य देताना दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Share Market
Financial Deadline In December : 31 डिसेंबरपूर्वी ही महत्त्वाची ७ कामे पूर्ण करा, अन्यथा होईल मोठं नुकसान

हिंद्दी पट्ट्यात भाजपचा दबदबा

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यानंतर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. या निकालानंतर परदेशी संस्थांनी गुंतवणूक वाढवल्याची माहिती मिळाली आहे. तर आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये दुसऱ्या तिमाहीत जीडीपीचे आकडे 7.6 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे बाजारात सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. तर चीनचा जीडीपी हा ४.९ टक्क्यांच्या पातळीवर कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com