Vivah Anudan Yojana : मुलीच्या लग्नासाठी सरकारकडून मिळतायत पैसे; या योजनेचा घ्या लाभ

Government Scheme: मुलींच्या लग्नासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून विवाह अनुदान योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सरकार १८ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलींच्या लग्नासाठी मदत करते.
Vivah Anudan Yojana
Vivah Anudan YojanaSaam Tv

Uttar Pradesh Vivah Anudan Yojana:

सरकार नेहमीच नवनवीन योजना राबवत असतात. नागरीकांच्या भल्यासाठी या योजना राबवल्या जातात. त्यात ज्येष्ठ नागरीक, महिला, गरोदर महिला, लहान मुले आणि मुलींसाठी अनेक योजना असतात. त्यातीलच एक योजना म्हणजे विवाह अनुदान योजना.

मुलींच्या लग्नासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश सरकार १८ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलींच्या लग्नासाठी मदत करते. या योजनेचा मुलींच्या पालकांना खूप फायदा होतो.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विवाह अनुदान योजना

विवाह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय १८ वर्ष आणि मुलाचे वय २१ असणे बंधनकारक आहे. एका कुटुंबातील दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. या योजनेत सर्व विभागातील कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती उत्तर प्रदेशची रहिवासी असावी.

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात ४६,८०० रुपये तर शहरी भागात ५६,४०० रुपयांपेक्षा जास्त नसावे.

अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न दारिद्रयरेषेखाली असावे.

Vivah Anudan Yojana
Amla Recipe : हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बहुगुणी आहे आवळा, आहारात याप्रकारे समावेश करा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे उत्तर प्रदेशचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्याशिवाय उत्पन्नाचे प्रमाणपत्र असायला हवे. तसेच जे लोक लग्न करणार आहेत त्यांच्या वयाचे प्रमाणपत्र असायला हवे. यासाठी तुमचे बँक खाते सरकारी बँकेत असायला हवे. या योजनेतून मिळणारी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होते. ही रक्कम तुम्ही मुलीच्या लग्नाच्यावेळी काढू शकता.

विवाह अनुदान योजनेसाठी मुलीच्या लग्नाच्या ९० दिवस आधी किंवा ९० दिवसनंतर अर्ज करु शकता. अर्जदार जर जाती प्रवर्गातील (OBC/SC/ST)असेल तर त्याच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असायला हवे.

Vivah Anudan Yojana
Vastu Tips : घरातील दक्षिण दिशेला चुकूनही लावू नका ही झाडे, लक्ष्मी देवी होईल नाराज; मिळतील अशुभ फले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com