कोमल दामुद्रे
लाडली बहन योजना काय आहे? याचा फायदा मध्य प्रदेशमध्ये कसा झाला.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानांनी लाडली बहन योजना आणली. ज्यातून महिलांना दरमहिन्याला 1,250 रुपये मिळत होते.
ज्याचा परिणाम मध्यप्रदेशातील मतांवर दिसून आला. ज्यामुळे भाजपच्या सत्तेच पारड आज जड झालं.
या योजनेचा लाभ 21 ते 60 वयोगटातील महिलांना मिळणार आहे.
यामध्ये शाळेत किंवा महाविद्यालयात शिकणाऱ्या महिलांना याचा फायदा मिळणार नाही. तसेच इनकम टॅक्स भरणाऱ्या महिलांना या योजनाचा लाभ घेता येणार नाही आहे.
लाडली बहन योजनेचा अर्ज तुम्ही ग्रामपंचायतीमधून करू शकता.
योजनेसाठी लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.