Amla Recipe : हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बहुगुणी आहे आवळा, आहारात याप्रकारे समावेश करा

Amla Benefits In Winter : शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उबदार पदार्थांचे सेवन करायला हवे. या ऋतूमध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आवळा फायदेशीर ठरतो.
Amla Recipe
Amla RecipeSaam Tv
Published On

Immunity Booster Recipe :

हिवाळ्यात वातावरणात बदल होत असतो. अशावेळी आरोग्याला अधिक फायदेशीर ठरतो आवळा. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उबदार पदार्थांचे सेवन करायला हवे. या ऋतूमध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आवळा फायदेशीर ठरतो.

आवळ्याचे सेवन केल्याने अनेक संसर्गजन्य आजारांपासून दूर राहाता येते. आवळ्याला हिवाळ्यात सूपरफूड म्हटले जाते. आवळा हा चवीला तुरट आणि काही प्रमाणात गोड असतो. परंतु, याच्या चवीमुळे अनेकजण खाणे टाळतात. जर तुम्हालाही आवळ्याचे सेवन करायचे असेल तर याप्रकारे करा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मुरंबा

लोकांना हिवाळ्यात (Winter Season) आवळा मुरंबा खायला आवडतो. यासाठी तुम्हाला रात्रभर आवळ्याला लिंबूच्या पाण्यात (Water) भिजवून ठेवावे लागेल. त्यानंतर सकाळी आवळा मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. वेगळ्या भांड्यात साखरेचा पाक तयार करा. त्यात एक चमचा वेलची पूड, उकडवलेले आवळे घालून काही मिनिटे गॅसवर शिजू द्या. तयार होईल आवळ्याचा मुरंबा

Amla Recipe
Chikki Recipe : थंडीच्या दिवसात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थाची चव चाखायची आहे? ट्राय करा, इम्युनिटी बूस्टर चिक्की

2. हलवा

आवळ्याचा हलवा बनवण्यासाठी त्याला उकळवून त्याच्या बिया काढून टाका. त्यानंतर त्याचा पल्प मॅश करा. पॅन गरम करुन त्यात तूप घाला. त्यानंतर त्यात मॅश केलेले मिसळा. नंतर त्यात वेलची पूड आणि साखर (Sugar) घाला. मंद आचेवर शिजल्यानंतर गॅस बंद करा. नियमित याचे सेवन केल्याने अनेक आजरांपासून दूर राहाता येईल.

3. चटणी

हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळ्याची चटणी फायदेशीर ठरेल. यासाठी तुम्ही आवळा बारीक कापून त्यात लसूण, हिरवी मिरची घालून साहित्य बारीक करुन घ्या. नंतर त्यात चमचाभर मोहरीचे तेल आणि चवीनुसार मीठ घालून चटणी तयार करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com