SBI च्या ग्राहकांना झटका! बँकेच्या एफडीवरील व्याजदरात कपात; नवे दर वाचा

SBI FD Interest Rate Decreases: स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे.
SBI SIP Calculation
SBI SIP CalculationSaam Tv
Published On

स्टेट बँक ऑफ इंडियाने एफडीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. एफडीवरील व्याजदर कमी झाल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र फटका बसणार आहे. एफडीवरील व्याजदर ०.२० टक्क्यांनी कमी केले आहे. ही कपात ३ कोटींपेक्षा जास्त असलेल्या एफडीवर करण्यात आली आहे. (SBI News)

SBI SIP Calculation
EPFO: नवीन नोकरी जॉइन केली अन् PF अकाउंट ट्रान्सफर केलं नाही? होऊ शकतं मोठं नुकसान

स्टेट बँकेचे एफडीवरील व्याजदर हे १६ मेपासून लागू होणार आहे. स्टेट बँकेने रेपो रेट कमी केल्यानंतर आता अनेक बँका एफडीवरील व्याजदर कमी करत आहे. दरम्यान, आता स्टेट बँकेने एफडीवरील व्याजदर कमी केले आहे.

स्टेट बँकेचे एफडी रेट्स (SBI FD Rates)

स्टेट बँक ऑफ इंडिया ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत एफडी ऑफर करते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त व्याजदर दिले जाते. या एफडीवरील व्याजदर ७.३० टक्के आहे.

SBI SIP Calculation
RBI Fine To SBI: RBI चा स्टेट बँकेला दणका! ठोठावला १.७२ कोटींचा दंड

स्टेट बँकेच्या एफडीचे नवे व्याजदर (SBI FDNew Interest Rate)

७ ते ४५ दिवसांच्या एफडीवर ३.५० टक्के व्याजदर तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ टक्के व्याजदर

४६ दिवस ते १७९ दिवसांसाठीच्या एफडीवर ५.५० टक्के व्याज तर ज्येष्ठ नागरिकांना ६ टक्के व्याज दिले जाते.

१८० ते २१० दिवसांच्या एफडीवर ६.०५ टक्के व्याज मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना ६.५५ टक्के व्याज मिळते.

२११ दिवस ते १ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ६.३० टक्के व्याज तर ज्येष्ठ नागरिकांना ६.८० टक्के व्याज मिळते.

१ ते २ वर्षांच्या एफडीवर ६.५० टक्के व्याज तर ज्येष्ठ नागरिकांना ७ टक्के व्याज

२ ते ३ वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना ६.७० टक्के व्याज तर ज्येष्ठ नागरिकांना ७.२० टक्के व्याज मिळते.

३ ते ५ वर्षांच्या एफडीवर ६.५५ टक्के व्याज मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना ७.०५ टक्के व्याज मिळते

SBI SIP Calculation
Rajiv Yuva Scheme: स्वतः चा बिझनेस सुरु करण्यासाठी सरकार देतंय ४ लाखांचे लोन; राजीव युवा योजना नक्की आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com