RBI Fine To SBI: RBI चा स्टेट बँकेला दणका! ठोठावला १.७२ कोटींचा दंड

RBI Imposes Fine To State Bank Of India: रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने स्टेट बँकेला दंड ठोठावला आहे. काही नियमांचे पालन न केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
RBI
RBIGoogle
Published On

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियावर कारवाई केली आहे. काही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने एसबीआयला दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांसाठी काही नियम घालून दिलेले आहे. सर्व बँकांना या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागतो. आता स्टेट बँकेने काही नियमांचे पालन केले नाही त्यामुळे रिझर्व्ह बँकेने कडक कारवाई केली आहे.

RBI
RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! एटीएममधून पैसे काढणे आता महागणार; व्यवहार शुल्कात केली वाढ

रिझर्व्ह बँकेने स्टेट बँकेवर लावला कोट्यवधींचा दंड

रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियावर १.७२ कोटी रुपयांचा दंड लावला आहे. बँकिंग नियमन कायदा, १९४९ अंतर्गत कर्ज, ग्राहक दायित्व आणि नियमाक तरतुदींशीसंबंधित नियमांचे पालन न केल्याबद्दल लावण्यात आले आहे. कर्ज आणि कर्जांच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्यामुळे दंड आकारण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियावर १.७२ कोटी रुपयांचा दंड लावला आहे.

RBI
Bank Loan: ग्राहकांना मोठा दिलासा! PNB, BOB आणि कॅनरा बँकेचा EMI होणार कमी, कारण....

जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडवरदेखील दंड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडवरही दंड लावला आहे. या बँकेवर १ कोटी रुपयांचा दंड आकापला आहे. बँकेच्या काही नियमांचे पालन न केल्याने हा दंड ठाठावला आहे. याबाबत आरबीआयने म्हटलंय की, दंड हे कोणत्याही विशिष्ट बँकिंग व्यव्हाराच्या आणि कराराच्या वैधतेवरील निर्णय नाहीत. नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

RBI
RBI चा १०० आणि २०० रुपयांच्या नोटांबाबत मोठा निर्णय! सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com