स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी भारत सरकारने अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या स्टेट बँकेच्या ग्राहकांना एक फ्रॉड मेसेज येत आहे. या मेसेजवर क्लिक केल्यावर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. यासाठी सरकारने अलर्ट जारी केला आहे Press Information Bureau (PIB) ने याबाबत फॅक्ट चेक करुन ग्राहकांना अलर्ट केले आहे.
सध्या देशभरात मोबाइलच्या माध्यमातून अनेक फ्रॉड होतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सध्या एसबीआय बँकेच्या नावाने एक मेसेज पाठवला जात आहे. रिवार्ड पॉइंटचा हा मेसेज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच नागरिकांना सावध राहण्याचा इशारा करण्यात आला आहे.
PIB ने दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने सध्या एक मेसेज पाठवला जात आहे. यामध्ये रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी एपीके फाइल डाउनलोड करायला सांगितले जाते. या मेसेजवरील लिंक ओपन करुन तुम्ही ती फाइल डाउनलोड केली तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. हा मेसेज फ्रॉड आहे. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने माहिती दिली आहे. बँकेने सांगितले की, SBI कधीच एसएमएस (SMS) किंवा व्हॉट्सअॅपद्वारे (Whatsapp)कोणतीही लिंक किंवा एपीके फाइल पाठवत नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तींकडून आलेल्या मेसेजवर क्लिक करु नका.
फ्रॉड मेसेजपासून वाचण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
कोणताही मेसेज आल्यावर तो मेसेज कोणत्या नंबरवरुन आला आहे ते चेक करा. एखाद्या बँकेच्या अधिकृत नंबरवरुन हा मेसेज आल्यावरच त्यावर क्लिक करा
अज्ञात नंबरवरुन कोणत्याही प्रकारची लिंक आल्यास त्यावर क्लिक करु नये.
फक्त अधिकृत वेबसाइट किंवा अॅपद्वारेच पेमेंट किंवा व्यव्हार करावेत.
कोणत्याही व्यक्तीला ई-मेल,एसएमएस आणि व्हॉट्सअॅपद्वारे आपली आर्थिक माहिती शेअर करु नये.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.