EPFO Alert: तुम्हीही EPFOचं सभासद आहात; तुम्हालाही EPFOचा कॉल आणि एसएमएस येतोय? मग सावधान

EPFO Alert: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO)ने आपल्या सर्व सभासदांसाठी एक अलर्ट जारी केलाय.
EPFO Alert
EPFO Alertsaam Tv
Published On

EPFO Alert:

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO)ने आपल्या सर्व सभासदांसाठी एक अलर्ट जारी केलाय. EPFOकधीही फोन, ई-मेल आणि सोशल मीडियाद्वारे कोणत्याही सदस्याची वैयक्तिक माहिती विचारत नाही. यासर्व माध्यमांतून कधीही कोणाशीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका,अशी सुचना दिलीय. (Latest News)

EPFO Alert
Atal Pension Yojana: उतारवयात पैशांची चणचण भासणार नाहीच! 210 रुपयांची गुंतवणूक करा; महिन्याला 5000 ची पेन्शन मिळवा, कसे ते जाणून घ्या

ईपीएफओने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट X वर ही सुचना पोस्ट केलीय. बनावट कॉल आणि संदेशांपासून सावध रहा. ईपीएफओ कधीही फोन, ई-मेल आणि सोशल मीडियाद्वारे सदस्यांकडून कोणतीही वैयक्तिक माहिती विचारत नसल्याचं सांगितलंय. 'सावध राहा, सावध रहा', तुमचा UAN/पासवर्ड/PAN/आधार/बँक खात्याचा तपशील/OTP किंवा इतर कोणतेही वैयक्तिक किंवा इतर कोणत्याही गोष्टी कधीही शेअर करू नका. आर्थिक तपशील. कोणाशीही शेअर करू नका.

ईपीएफओ किंवा त्याचे कर्मचारी कधीही मेसेज, फोन, ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप, सोशल मीडियावर हे तपशील विचारत नाहीत,असा संदेश ईपीएफओकडून देण्यात आलाय.ईपीएफओने सोशल मीडियाच्या पोस्टरमध्ये म्हटले की, अशी माहिती विचारणाऱ्या बनावट कॉल्स/मेसेज करणाऱ्याविरोधात लगेच पोलीस/सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करा. याशिवाय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनने सभासदांना अजून एक संदेश दिलाय.

FPFOच्या PF, पेन्शन किंवा EDLI योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही EPFO ​​हेल्पलाइन १४४७० वर कॉल करू शकता. ही हेल्पलाइन सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असते. इंग्रजी व्यतिरिक्त तुम्हाला हिंदी, गुजराती, मराठी, कन्नड, तमिळ, तेलुगू बंगाली आणि आसामी भाषेतही माहिती मिळू शकते, असं EPFO नं सांगितलंय.

EPFO Alert
PF News: 72 तासांत तुमच्या बँक खात्यात येऊ शकतात पीएफचे पैसे, जाणून घ्या कसे...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com