Samsung Galaxy M56 5G: सॅमसंगकडून भारतात सेगमेंटमधील सर्वात स्लिम स्‍मार्टफोन गॅलॅक्‍सी एम५६ ५जी लाँच

Samsung Galaxy M56 5G Launched in India: गॅलॅक्‍सी एम५६ ५जी मध्‍ये गोरिला ग्‍लास व्हिक्‍टस+ संरक्षण आणि विविध अत्‍याधुनिक इनोव्‍हेशन्‍स आहेत.
Samsung Galaxy M56 5G Launched in India
Samsung Galaxy M56 5Ggoogle
Published On

Samsung Galaxy M56 5G Launched in India: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज गॅलॅक्‍सी एम५६ ५जी च्‍या लाँचची घोषणा केली. हा त्‍याच्‍या सेगमेंटमधील सर्वात स्लिम स्‍मार्टफोन आहे. लोकप्रिय गॅलॅक्‍सी एम सिरीजमधील नवीन स्‍मार्टफोन वापरकर्त्‍यांना उच्‍च दर्जाचा स्‍मार्टफोन अनुभव देतो, जेथे पुढील व मागील बाजूस गोरिला ग्‍लास व्हिक्‍टस+ संरक्षण, ५० मेगापिक्‍सल ट्रिपल कॅमेरासह ओआयएस व १२ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट एचडीआर कॅमेरा आणि प्रगत एआय एडिटिंग टूल्‍स आहेत.

''अर्थपूर्ण इनोव्‍हेशन्‍स वितरित करण्‍याप्रती आमच्‍या अविरत कटिबद्धतेचा भाग म्‍हणून आम्‍हाला स्‍टाइल, टिकाऊपणा आणि अभूतपूर्व कार्यक्षमतेचे शक्तिशाली संयोजन असलेल्‍या गॅलॅक्‍सी एम५६ ५जी च्‍या लाँचची घोषणा करताना अभिमान वाटतो. हा त्‍याच्‍या सेगमेंटमधील सर्वात स्लिम स्‍मार्टफोन आहे, तरीदेखील दीर्घकाळापर्यंत कार्यरत राहण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या स्‍मार्टफोनच्‍या पुढील व मागील बाजूस गोरिला ग्‍लास व्हिक्‍टस+ संरक्षण आहे, ज्‍यामुळे आतापर्यंतच्‍या सर्वात शक्तिशाली एम सिरीज स्‍मार्टफोन आहे.

Samsung Galaxy M56 5G Launched in India
Wedding Blouse Ideas: जिनिलीयाचा स्वॅगच लय भारी! लग्नसमारंभात तुम्हीच दिसाल उठून, फॉलो करा 'या' हटके ब्लाउज डिझाईन

फ्रण्‍ट एचडीआर कॅमेरासह क्षणांना कॅप्‍चर करायचे असो किंवा प्रगत एआय एडिटिंग टूल्‍ससह क्रिएटिव्‍ह शक्‍यतांना एक्‍स्‍प्‍लोअर करायचे असो गॅलॅक्‍सी एम५६ ५जी त्‍याच्‍या पॉवर-पॅक वैशिष्‍ट्यांसह स्‍मार्टफोन अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे,'' असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे संचालक अक्षय एस. राव म्‍हणाले.

प्रीमियम डिझाइन आणि डिस्‍प्‍ले

मागील बाजूस प्रीमियम ग्‍लास आणि मेटक कॅमेरा डेकोसह गॅलॅक्‍सी एम५६ ५जी गॅलॅक्‍सी एम सिरीजमध्‍ये उत्‍साहवर्धक व प्रीमियम डिझाइन अपग्रेड आणतो. सेगमेंटमधील सर्वात स्लिम असण्‍यासह गॅलॅक्‍सी एम५६ ५जी ची जाडी फक्‍त ७.२ मिमी आहे आणि पुढील व मागील बाजूस कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास व्हिक्‍टस® संरक्षण असेल, ज्‍यामुळे हा स्‍लीक व शक्तिशाली स्‍मार्टफोन आहे. ६.७ इंच फुल एचडी+ सुपर एएमओएलईडी+ डिस्‍प्‍ले असलेला गॅलॅक्‍सी एम५६ ५जी ग्राहकांना आकर्षक व्हिज्‍युअल्‍स आणि उत्‍साहवर्धक व्‍युइंग अनुभव देतो.

मोठे डिस्‍प्‍ले १२०० नीट्स हाय ब्राइटनेस मोड (एचबीएम) आणि व्हिजन बूस्‍टर तंत्रज्ञानासह येतो, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना प्रखर सूर्यप्रकाशात देखील त्‍यांच्‍या आवडत्‍या कन्‍टेन्‍टचा प्रभावीपणे आनंद घेता येतो. १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट तंत्रज्ञानप्रेमी जनरेशन झेड आणि मिलेनियल ग्राहकांसाठी सोशल मीडिया फिडमधून स्‍क्रॉलिंग सोपे करते. गॅलॅक्‍सी एम५६ ५जी लाइट ग्रीन आणि ब्‍लॅक या दोन आकर्षक रंगांमध्‍ये येईल.

प्रगत फोटोग्राफी (Advanced photography)

गॅलॅक्‍सी एम५६ ५जी मध्‍ये हाय-रिझॉल्‍यूशन व शेक-फ्री व्हिडिओज आणि फोटोज कॅप्‍चर करण्‍यासाठी ५० मेगापिक्‍सल ओआयएस ट्रिपल कॅमेरा आहे, जेथे फोटो काढताना हात थरथरणे किंवा नकळतपणे होणाऱ्या हालचालींमुळे फोटो ब्‍लर होण्‍याची शक्‍यता दूर होते. या स्‍मार्टफोनमध्‍ये आकर्षक व लक्षवेधक सेल्‍फीजसाठी फ्लॅगशिप-ग्रेड १२ मेगापिक्‍सल एचडीआर फ्रण्‍ट कॅमेरा आहे. गॅलॅक्‍सी एम५६ ५जी वापरकर्त्‍यांना १०-बीट एचडीआरमध्‍ये ४के ३० एफपीएस व्हिडिओज रेकॉर्ड करण्‍याची सुविधा देईल, ज्‍यामुळे वास्‍तविक रूपात विविध रंगसंगतींमध्‍ये व्हिडिओज रेकॉर्ड करता येतील. कॅमेरे अंधुक प्रकाशात देखील आकर्षक फोटोज व व्हिडिओज कॅप्‍चर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत.

ज्‍यासाठी बिग पिक्‍सल टेक्‍नॉलॉजी, लो नॉईज मोड मदत करतात आणि एआय आयएसपी नाइटोग्राफीला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. कॅमेरा सिस्‍टममध्‍ये पोर्ट्रेट २.० असण्‍यासोबत रिअर कॅमेऱ्यावर २X झूम आहे, जे सुस्‍पष्‍ट व नॅच्‍युरल बोकेह इफेक्‍ट सक्षम करते. या स्‍मार्टफोनमध्‍ये ऑब्‍जेक्‍ट इरेजर, एडिज सजेशन्‍स यांसारखी प्रगत एआय-पॉवर्ड एडिटिंग टूल्‍स देखील असतील, ज्‍यामुळे प्रत्‍येक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्‍ट करण्‍यासाठी सुसज्‍ज असतील.

मॉन्‍स्‍टर प्रोसेसर (Monster processor)

गॅलॅक्‍सी एम५६ ५जी मध्‍ये एलपीडीडीआर५एक्‍ससह ४ एनएम आधारित एक्झिनॉस १४८० प्रोसेसरची शक्‍ती आहे, ज्‍यामुळे हा स्‍मार्टफोन गतीशील व ऊर्जा-कार्यक्षम आहे आणि वापरकर्ते सहजपणे मल्‍टी-टास्‍क करू शकतात. प्रोसेसर त्‍याच्‍या फ्लॅगशिप लेव्‍हल वेपर कूलिंग चेम्‍परसोबत हाय-क्‍वॉलिटी ऑडिओ व व्हिज्‍युअल्‍सच्‍या माध्‍यमातून मॉन्स्‍टर मोबाइल गेमिंग अनुभव देते. ५जी चे अल्टिमेट स्‍पीड व कनेक्‍टीव्‍हीटीसह वापरकर्ते सर्वत्र पूर्णत: कनेक्टेड असतील, जेथे त्‍यांना गतीशील डाऊनलोड्स, सुलभ स्‍ट्रीमिंग आणि विनाव्‍यत्‍यतय ब्राऊजिंगचा अनुभव मिळेल.

फास्‍ट चार्जिंगसह मॉन्‍स्‍टर बॅटरी (Monster battery with fast charging)

गॅलॅक्‍सी एम५६ ५जी मध्‍ये ५००० एमएएच बॅटरी आहे, जी दीर्घकाळपर्यंत ब्राउजिंग, गेमिंग व मनसोक्‍त मनोरंजनाची खात्री देते. गॅलॅक्‍सी एम५६ ५जी वापरकर्त्‍यांना कनेक्‍टेड राहण्‍यास, विनाव्‍यत्‍यय मनोरंजनाचा आनंद घेण्‍यास आणि उत्‍पादनक्षम राहण्‍यास मदत करतो.

गॅलॅक्‍सी एक्‍स्‍पेरिअन्‍सेस (Galaxy Experiences)

नवीन उद्योग मापदंड स्‍थापित करत गॅलॅक्‍सी एम५६ ५जी सेगमेंटमधील अँड्रॉइड अपग्रेड्सच्‍या सर्वोत्तम ६ जनरेशन्‍स आणि ६ वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्स देईल, ज्‍यामुळे फ्यूचर-रेडी अनुभवाची खात्री मिळेल. गॅलॅक्‍सी एम५६ ५जी वन यूआय ७ आऊट ऑफ द बॉक्‍ससह येईल. वन यूआय ७ साध्‍या, प्रभावी व इमोटिव्‍ह डिझाइनसह येते, ज्‍यामधून गॅलॅक्‍सी वापरकर्त्‍यांना सुव्‍यवस्थित व कोहेसिव्‍ह अनुभव मिळेल. सुलभ होम स्क्रिन, रिडिझाइन केलेले वन यूआय विजेट्स आणि लॉक स्क्रिन वापरकर्त्‍यांना त्‍यांचे डिवाईसेस विनासायासपणे कस्‍टमाइज करण्‍याची सुविधा देतात.

अधिक सोयीसुविधेसाठी नाऊ बार लॉक स्क्रिनवर सर्वात महत्त्वाचे असलेले रिअल-टाइम अपडेट्स देते. ज्‍यामुळे सकाळच्‍या वेळी रनिंगदरम्‍यान वापरकर्ते सहजपणे त्‍यांची प्रगती तपासू शकतात आणि गॅलॅक्‍सी बड्सवर आवडती गाणी ऐकण्‍याचा आनंद घेऊ शकतात, हे सर्व सिम्‍पल स्‍वाइपसह करता येते, ज्‍यासाठी फोन अनलॉक करण्‍याची गरज भासत नाही. याव्‍यतिरिक्‍त, सखोल गुगल जेमिनी इंटीग्रेशनसह मित्रासेाबत बोलण्‍याप्रमाणे डिवाईस सहजपणे नियंत्रित करता येतो.

गॅलॅक्‍सी एम५६ ५जी मध्‍ये सॅमसंगचे सर्वात नाविन्‍यपूर्ण सुरक्षितता वैशिष्‍ट्य 'सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट'सह येईल. ही हार्डवेअर-आधारित सिक्‍युरिटी सिस्‍टम हार्डवेअर व सॉफ्टवेर हल्‍ल्‍यांपासून सर्वसमावेशक संरक्षण देते.

Product Variant Introductory Price Offers

Galaxy M56 8GB+128GB INR 24999 Including INR 3000 Instant Bank Discount

Samsung Galaxy M56 5G Launched in India
JCB चा Full Form माहितीये का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com