Samsung Galaxy : सॅमसंगच्या गॅलॅक्‍सी बुक४ सिरीजची प्री-बुकिंग सुरू; जाणून घ्या फीचर्स

Samsung Galaxy Book4 : सॅमसंगच्या गॅलॅक्‍सी बुक४ सिरीजची प्री-बुकिंग आजपासून सुरू झालीय. गॅलॅक्‍सी बुक४ सिरीजमध्‍ये नवीन इंटेलिजण्‍ट प्रोसेसर, अधिक वैविध्‍यपूर्ण व इंटरअॅक्टिव्‍ह डिस्‍प्‍ले आणि प्रबळ सिक्‍युरिटी सिस्‍टम आहे.
Samsung Galaxy Book4
Samsung Galaxy Book4google
Published On

Samsung Galaxy Book4:

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने आज गॅलॅक्‍सी बुक४ प्रो ३६०, गॅलॅक्‍सी बुक४ प्रो आणि गॅलॅक्‍सी बुक४ ३६० सह सर्वात इंटेलिजण्‍ट पीसी लाइनअप गॅलॅक्‍सी बुक४ सिरीजसाठी प्री-बुकिंगला सुरूवात केलीय.(Latest News)

गॅलॅक्‍सी बुक४ सिरीजमध्‍ये नवीन इंटेलिजण्‍ट प्रोसेसर, अधिक वैविध्‍यपूर्ण व इंटरअॅक्टिव्‍ह डिस्‍प्‍ले आणि प्रबळ सिक्‍युरिटी सिस्‍टम आहे. ज्‍यामधून एआय पीसीच्‍या नवीन युगाला सुरूवात होते, जे अल्टिमेट उत्‍पादकता, गतीशीलता आणि कनेक्‍टीव्‍हीटी देते. या सुधारणांसह डिवाईस अधिक सुधारित होण्‍यासह संपूर्ण सॅमसंग गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टम दृढ झालीय. तसेच पीसी श्रेणी प्रगत होण्‍यासह आजच्‍या भावी पिढीसाठी सॅमसंगच्‍या एआय नाविन्‍यतेच्‍या दृष्टिकोनाला गती मिळालीय.

उच्‍च स्‍तरीय कनेक्‍टीव्‍हीटी, गतीशीलता आणि उत्‍पादकतेला सादर करत गॅलॅक्‍सी बुक४ सिरीज वापरकर्त्‍यांच्‍या त्‍यांचे पीसी, स्‍मार्टफोन्‍स, टॅब्‍लेट्स व इतर डिवाईसेससोबत संवाद साधण्यास सोईस्कर आहे. शक्तिशाली कार्यक्षमतेसाठी इंटेलिजण्‍ट प्रोसेसर असलेल्‍या गॅलॅक्‍सी बुक४ सिरीजमध्‍ये नवीन इंटेल कोअर अल्‍ट्रा ७/अल्‍ट्रा५ प्रोसेसर आहे. यात गतीशील सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (सीपीयू), उच्‍च कार्यक्षम ग्राफिक्‍स प्रोसेसिंग युनिट (जीपीयू) आणि नवीन भर करण्‍यात आलेले न्‍यूरल प्रोसेसिंग युनिट (एनपीयू) आहे.

एआय क्षमतांना नव्‍या उंचीवर घेऊन जात गॅलॅक्‍सी बुक४ सिरीजमध्‍ये उत्‍पादकता वाढवण्‍यासाठी इंटेलचा इंडस्ट्री-फर्स्‍ट एआय पीसी अॅक्‍सेलरेशन प्रोग्राम आहे. गॅलॅक्‍सी बुक४ सिरीजमध्‍ये आकर्षक व इंटरअॅक्टिव्‍ह डिस्‍प्‍लेसह डायनॅमिक एएमओएलईडी २Xडिस्‍प्‍ले आहे. यामधील व्हिजन बूस्‍टर इंटेलिजण्‍ट आऊटडोअर अल्‍गोरिदमचा वापर करत प्रखर प्रकाशात आपोआपपणे व्हिजि‍बिलिटी व कलर रिप्रॉडक्‍शन सुधारते, तर अॅण्‍टी-रिफ्लेक्टिव्‍ह तंत्रज्ञान व्‍यत्‍यय आणणाऱ्या रिफ्लेक्‍शन्‍सना दूर करते.

साऊंड क्‍वॉलिटी तितकीच उच्‍च दर्जाची आहे, एकेजी क्‍वॉड स्‍पीकर्ससह डॉल्‍बी अॅटमॉस सुस्‍पष्‍ट आवाजासाठी विशाल आणि बास दिली आहेत.

Samsung Galaxy Book4
Startup Business Idea : टी-शर्ट प्रिंटिंगच्या व्यवसायातून करा बक्कळ कमाई, जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com