सरकारी कर्मचारी होणार मालामाल; पगारात भरघोस वाढ कधीपासून होणार?

government employees Salary : आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची खूशखबर...कारण केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे... मात्र ही वाढ नेमकी किती होणार आहे... पाहूयात यावरचा खास रिपोर्ट...
central govenment
8 commission paySaam tv
Published On

8 व्या वेतन आयोगाकडे डोळे लावून बसलेल्या केंद्र सरकारी कर्मचारी आता मालामाल होण्याची शक्यता आहे..कारण केंद्र सरकारने 8 वा वेतन आयोग स्थापन केलाय...या आयोगानुसार 49 लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि 69 लाख पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.. त्यासाठी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 8 वा वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार पगारात वाढ करणार असल्याचं समोर आलंय...मात्र हा फिटमेंट फॅक्टर कसा मोजला जातो... पाहूयात...

central govenment
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? पगारवाढ कधी येणार? वाचा सविस्तर

एखाद्या कर्मचाऱ्याचा जुना बेसिक पगाराला 2.57 टक्क्यांनी गुणल्यानंतर येणारं उत्तर हा नवा पगार असतो.... म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 18 हजार असेल तर 8 व्या वेतन आयोगानुसार हा पगार 46 हजार 260 रुपये इतका होण्याची शक्यता आहे... तर सध्या 58 टक्के इतका महागाई भत्ता देण्यात येतो.. त्यात वाढ होऊन हा भत्ता 61 टक्के इतका होण्याची शक्यता आहे...

central govenment
Dearness Allowance: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होण्याची शक्यता, किती होणार तुमचा पगार?

खरंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात 10-20 नाही तर आता 257 टक्के इतकी वाढ होण्याची शक्यता आहे... त्यामुळे कर्मचाऱ्यांची फक्त पगारवाढच नाही तर त्यांना जानेवारी ते मार्च असा तीन महिन्यांच्या पगाराचा फरकही देण्यात येणार आहे... त्यामुळे ऐन युद्ध आणि जग मंदीच्या उंबरठ्यावर असताना सरकारी कर्मचारी मात्र मालामाल होण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com