

नोव्हेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. नोव्हेंबर महिन्यात पैशासंबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामध्ये आधार अपडेटपासून ते बँकेच्या अनेक नियमांचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात पाच महत्वाचे नियम बदलणार आहे. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.
नोव्हेंबरमध्ये हे नियम बदलणार (Rule Changes in November)
आधार कार्ड (Aadhaar Card Rule)
आता तुम्ही घरबसल्या आधार कार्ड अपडेट करु शकणार आहात. तुम्ही आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर कोणत्याही कागदपत्राशिवाय अपडेट करु शकतात. याआधी तुम्हाला आधार केंद्रावर जाऊन हे काम करावे लागायचे.
आधार कार्डमध्ये अपडेट (Aadhaar Card Update)
आता तुम्हाला UIDAI पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्डशिवाय तुमच्या आधार कार्डचे व्हेरिफिकेशन करु शकणार आहे. यामुळे ही अपडेटची प्रक्रिया जलद आणि सोपी होणार आहे.
आधार पॅन लिंक (Aadhaar Pan Card Link)
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. तुम्हाला ३१ डिसेंबरपर्यंत आधार पॅन लिंक करायचे आहे. अन्यथा १ नोव्हेंबरनंतर लिंक न केलेले पॅन कार्ड निष्क्रिय होतील.
बँक खात्यासाठी नॉमिनी (Bank Rule)
आता बँक खात्यासाठी किंवा लॉकरसाठी आणि एफडीसाठी तुम्ही चार जणांना नॉमिनी करु शकतात. त्यांच्या टक्केवारीचा आकडादेखील निश्चित करु शकत होता. याआधी फक्त एकच नॉमिनी होता.
स्टेट बँकेचे नियम (State Bank Rule)
स्टेट बँकेने १ नोव्हेंबरपासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता असुरक्षित क्रेडिट कार्डवर ३.७५ टक्के शुल्क आकारले जाणार आहे. जर तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी अॅपद्वारे शाळा किंवा कॉलेज फी भरली तर १ टक्के शुल्क आकारले जाईल. शाळेच्या अधिकृत वेबसाइट किंवा पीओएसद्वार पेमेंट केले तर शुल्क आकारले जाणार नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.