

तुम्हाला आयुष्यात आर्थिक सुरक्षितता हवी असेल आणि निवृत्तीनंतर चांगले आयुष्य हवे असेल, तर पैशांचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी भारत सरकारची नॅशनल पेन्शन स्कीम ही योजना राबवली जाते. नॅशनल पेन्शन स्कीम टियर 1 खाते ही भारतात सेवानिवृत्ती निधी तयार करण्यासाठी कार्य (Work) करते.
नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) टियर 1 खाते ही भारत सरकारद्वारे समर्थित दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. यामध्ये, तुम्ही वयाच्या 60 वर्षापर्यंत लॉक-इन योगदानाद्वारे सेवानिवृत्ती निधी तयार करू शकता. ही योजना तुम्हाला निवृत्तीनंतर महिन्याला नियमित उत्पन्न देते. या योजनेत दिलेले योगदान वयाच्या 60 वर्षापर्यंत बंधनकारक असते.
तुमचे पैसे कुठे गुंतवले आहेत?
नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) टियर 1 खात्यात गुंतवलेले पैसे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच PFRDA मध्ये जमा होतात. ही भारतातील नॅशनल पेन्शन स्कीमवर देखरेख करणारी नोडल एजन्सी आहे. यानंतर पीएफआरडीए तुमचा निधी वेगवेगळ्या फंड व्यवस्थापकांना देते. हे फंड मॅनेजर ही रक्कम तुम्ही निवडलेल्या गुंतवणूक (Investment) योजनेच्या आधारे मालमत्तेच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवतात.
PPF पेक्षा जास्त परतावा देण्याची क्षमता...
तुमच्या नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) टियर 1 खात्यावर तुम्हाला मिळणारा परतावा तुम्ही निवडलेल्या फंडवर आणि एकूण बाजार परिस्थितीवर अवलंबून असतो. तथापि, NPS मध्ये PPF सारख्या पारंपारिक पेन्शन योजनांपेक्षा जास्त परतावा देण्याची क्षमता असते. कारण ते तुमच्या रकमेचा काही भाग शेअर्समध्येही गुंतवतो.
NPS टियर 1 खात्याची ही काही खास वैशिष्ट्ये आहेत :
18 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व भारतीय नागरिक नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) टियर 1 खात्यात खाते उघडू शकतात. परदेशात राहणारे भारतीय नागरीक देखील या योजनेत सहभागी होऊ शकतात.
नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) टियर 1 खात्यात किमान वार्षिक योगदान रुपये 1000 जमा करणे आहे. या योजनेत तुम्ही कितीही पैसे गुंतवू शकता. तुम्ही या योजनेत मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर गुंतवणूक करू शकता.
नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) टियर 1 खात्यातील गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहेत. येथे वार्षिक गुंतवणूक केलेल्या 1.5 लाख रुपयांवर कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. त्याच वेळी, पगारदार कर्मचार्यांनी केलेल्या गुंतवणुकीसाठी कलम 80CCD (1B) अंतर्गत 50,000 रुपयांच्या अतिरिक्त कपातीचा दावा केला जाऊ शकतो.
नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) टियर 1 खात्यातील परतावा हा फंडाच्या कामगिरीवर आणि गुंतवणूकदाराने निवडलेल्या मालमत्ता वाटपावर अवलंबून असतो. ही योजना इक्विटी आणि डेट फंड यांचे एकत्राकरण देते.
वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही 60 टक्के निधी मिळवू शकता, तो करमुक्त असेल. उर्वरित टक्के रक्कम IRDA नियंत्रित जीवन विमा कंपनीकडून वार्षिकी खरेदी करण्यासाठी वापरली जाईल. ही वार्षिकी रक्कम तुम्हाला उर्वरित आयुष्यासाठी नियमित मासिक उत्पन्न प्रदान करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.