PPF Scheme: १५ वर्षात लखपती होण्याचा फॉर्म्यूला सापडला; दिवसाला फक्त १५ रुपयांची गुंतवणूक अन् भरघोस परतावा

Scheme: पब्लिक प्रोव्हिडंट फंड मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हा चांगला परतावा मिळू शकतो. पोस्ट ऑफिसपासून सार्वजनिक बँकामध्ये या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता.
PPF Scheme
PPF Scheme Saam Tv
Published On

Public Provident Fund Scheme:

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असतात. सरकारी योजनांपासून शेअर्स बाजार बाजारामध्ये अनेक लोक गुंतवणूक करतात. मात्र, शेअर्समध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे असते. त्यामुळे जर तुम्हाला कमी किमतीत चांगला परतावा मिळवायचा असेल तर त्यासाठी पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजनेत गुंतवणूक करु शकतात.

पब्लिक प्रोव्हिडंट फंड मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हा चांगला परतावा मिळू शकतो. पोस्ट ऑफिसपासून सार्वजनिक बँकामध्ये या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. (Latest News)

पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये तुम्ही किमान ५०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. एका वार्षिक वर्षात तुम्ही ५०० रुपये ते १.५ लाखापर्यंत गुंतवणूक करु शकतात. याचा अर्थ तुम्हाला एका दिवसाला १५ रुपयांची गुंतवणूक करायची आहे.

या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना ७.१ टक्के व्याज दिले जात आहे. पीपीएफ खात्यातील मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा आहे. मॅच्युरिटीनंतर तुम्ही संपूर्ण पैसे काढू शकता. जर तुम्हाला पैसे काढायचे नसतील तर अजून ५ वर्षे ठेवू शकतात. मॅच्युरिटी कालावधी वाढवण्यासाठी एका वर्षाआधी अर्ज करावा लागेल.

PPF Scheme
Ather 450 Apex स्कूटर लाँच; सिंगल चार्जमध्ये मुंबई -पुणे येईल गाठता

५ वर्षापर्यंत पैसे काढता येणार नाही

या योजनेअंतर्गत तुम्ही खाते उघडल्यास पाच वर्षांपूर्वी परिस्थिती काढता येणार नाही. या योजनेअंतर्गत पाच वर्षांचा लॉक इन कालावधी आहे. पाच वर्षानंतर तुम्ही फॉर्म २ भरुन पैसे काढू शकता. तुम्ही १५ वर्षाआधी पैसे काढल्यास १ टक्के व्याज कापले जाईल.

PPF योजना EEE च्या श्रेणीत येते. या योजनेअंतर्गत संपूर्ण गुंतवणूकीवर सवलतीचा लाभ मिळतो. PPF योजनेअंतर्गत आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर वार्षिक कर सूट मिळू शकते. 

PPF Scheme
OnePlus Ace 3 झटपट होतो चार्ज; जाणून घ्या भारतात कधी होणार लॉन्च, काय असेल किमत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com