Ather 450 Apex स्कूटर लाँच; सिंगल चार्जमध्ये मुंबई -पुणे येईल गाठता

Ather EV: देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटची क्रेझ वाढत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने इलेक्ट्रिक स्कूटर अत्यंत चांगली असल्याचे मानले जाते. नुकतीच एथर कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लाँच केली आहे.
Ather 450 Apex EV
Ather 450 Apex EVSaam Tv
Published On

Ather 450 Apex Features And Specification:

देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटची क्रेझ वाढत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने इलेक्ट्रिक स्कूटर अत्यंत चांगली असल्याचे मानले जाते. नुकतीच एथर कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लाँच केली आहे.

Ather Energy आज आपला दहावा वर्धापन दिन साजरा करत आहे. याच प्रसंगी कंपनीने Ather 450 Apex स्कूटर भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर नवीन लूक आणि फिचर्ससह बाजारात लाँच करण्यात आली आहे. जाणून घेऊया या स्कूटरबद्दल. (Latest News)

किंमत

एथर कंपनीची ही नवीन स्कूटर Ather 450 Apex बाजारात लाँच झाली आहे. या स्कूटरची किंमत १.८९ लाख रुपये आहे. स्कूटरची प्री बुकिंग सुरू झाली आहे. या स्कूटरची डिलिव्हरी मार्च महिन्यात सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्कूटरची लिमिटेड एडिशन फेब्रुवारीमध्ये Ather शोरुममध्ये येईल.

Ather 450 Apex बॅटरी

Ather 450 Apex स्कूटरमध्ये PMSM 7Kw बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही बॅटरी 9.3 bhp पॉवर आणि 26 Nm टॉर्क जनरेट करते. या कंपनीच्या मागील मॉडेलमध्ये 6.4 Kw चा बॅटरी पॅक देण्यात आला होता.

Ather 450 Apex EV
Gold Silver Rate (6th January 2024): सोन्याच्या भावात किचिंत वाढ, चांदीची चकाकी नरमली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

या स्कूटरचा टॉप स्पीड १०० किमी/ तास आहे. स्कूटर २.९ सेकंदात ४० किमीचा वेग गाठते. या स्कूटर सिंगल चार्जमध्ये १५७ किमी रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने या नवीन स्कूटरमध्ये Ather 450Xमध्ये असलेला वार्प राइडिंग मोडला Warp+ राइडिंग मोडमध्ये बदलण्यात आले आहे. यात TrueRangeT, SmartEcoTM, Eco, Ride, Sport, Warp+ मोड देण्यात आले आहेत.या स्कूटरला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ५ तास ४५ मिनिटे लागतात.

Ather 450 Apex EV
OnePlus Ace 3 झटपट होतो चार्ज; जाणून घ्या भारतात कधी होणार लॉन्च, काय असेल किमत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com