

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय
रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही
कर्जदारांना दिलासा नाही
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट हा स्थिर आहे. मागच्या वेळीसारखा रेपो रेट ५.५ वर स्थिर आहे. रेपो रेटमध्ये बदल होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यामध्ये काहीच बदल झालेला नाही.
रेपो रेटमध्ये आतापर्यंत झालेला बदल (Repo Rate Changes)
दर दोन महिन्यांनी रिझर्व्ह बँकेची पतधोरण बैठक होते. यामध्ये रेपो रेटमध्ये बदल केले जातात. मागच्या वेळी डिसेंबर महिन्यात रेपो रेट ५.५ वरुन ५.२५ करण्यात आला होता. यामध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. त्याआधी सलग तीन वेळा रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नव्हता. ऑक्टोबर २०२५, ऑगस्ट २०२५ आणि जून २०२५ मध्ये झालेल्या पतधोरण बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नव्हता. रेपो रेट ५.५ होता.
२०२६ मधील पहिली बैठक (RBI MPC Meeting in February 2026)
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा (RBI Governer Sanjay Malhotra) यांच्या अध्यक्षतेखाली २०२६ मधील पहिली पतधोरण बैठक झाली. यामध्ये सर्वांच्या संमतीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये कोणताही बदल न केल्याने सर्वसामान्यांना दिला मिळाला नाही. आता कर्जावरील व्याजदर स्थिर राहणार आहेत. त्यामुळे कर्जाचा हप्ता कमी होणार नाहीये.
कर्जदारांना दिलासा नाहीच (No Relief to Borrowers)
रेपो रेटवर कर्जाचे व्याजदर ठरवले जाते. रिझर्व्ह बँक रेपो रेट ठरवून देते त्यानुसार सर्व बँकांना कर्जावरील हप्ता निश्चित करायचा असतो. जर रेपो रेटमध्ये कपात झाली तर कर्जाचा हप्ता आपोआप कमी होतो. जर रेपो रेटमध्ये वाढ झाली तर व्याजदर वाढते. परंतु सध्या यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.