
आरबीआयने एटीएमच्या नियमांत केले बदल
मर्यादेपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शनवर भरावा लागणार शुल्क
कमाल २३ रुपये शुल्क भरावे लागेल
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएमबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांत बदल केला आहे.यामध्ये ट्रान्झॅक्शन लिमिट, कॅश डिपॉझिट आणि विदड्रॉवलच्या नियमांत बदल केले आहे. यासाठी आता तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे मात्र, सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएमबाबत नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांमुळे ग्राहकांनी जर मर्यादेपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन केले तर त्यांना पैसे भरावे लागणार आहे. कोणत्या बँकेसाठी काय नियम आहे ते जाणून घ्या.
रिझर्व्ह बँकेने काय बदल केला? (Reserve Bank Of India Rule Change of ATM)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम ट्रान्झॅक्शन, कॅश लिमिट, बँक चार्जच्या नियमांत काही बदल केले आहेत.
आता ग्राहकांना फक्त ३ एटीएम ट्रान्झॅक्शनपर्यंत मोफत सुविधा मिळणार आहे. यामध्ये कॅश विड्रॉवल आणि बँलेंस चेक करण्याचा समावेश आहे.
मेट्रो शहरांव्यतिरिक्त इतर ठिकाणी तुम्हाला ५ ट्रान्झॅक्शनपर्यंत मोफत सुविधा मिळणार आहे.
जर तुम्ही मर्यादेनंतर ट्रान्झॅक्शन केले तर बँक तुमच्याकडून चार्जेस घेईल. यामध्ये तुम्हाला कमाल २३ रुपये चार्ज भरावा लागेल. नॉन फायनान्शियल गोष्टींवर ११ रुपये भरावे लागणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेत २३ रुपये चार्ज लागणार आहे. एचडीएफसी बँकेत २३ रुपये चार्ज लागणार आहे. तर स्टेट बँकेने त्यांच्या चार्जेसमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
कॅश डिपॉझिटवर कोणताही चार्ज लागणार आहे. तसेच मर्यादेपेक्षा जास्त कॅश विड्रॉवलवर चार्जेस लागणार आहे.
जर तुम्ही २० लाख किंवा त्यापेक्षा जास्त कॅश जमा करत असाल तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड देणे अनिवार्य आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.