आता पैसे ठेवण्यासाठी अन् काढण्यासाठीही लागेल एक्स्ट्रा चार्ज; बँकेकडून नवीन नियमावली जाहीर

ICICI Bank Hikes Charges: आयसीआयसीआय बँकेनं एटीएम आणि शाखा व्यवहारांवरील शुल्क वाढवले. दर महिन्याला फक्त ३ मोफत व्यवहार; त्यानंतर १५० रुपये शुल्क. १ लाखाहून अधिक रकमेच्या व्यवहारांवर १००० रुपये शुल्क लागू.
ICICI Bank
ICICI BankSaam Tv News
Published On
Summary
  • आयसीआयसीआय बँकेनं एटीएम आणि शाखा व्यवहारांवरील शुल्क वाढवले.

  • दर महिन्याला फक्त ३ मोफत व्यवहार; त्यानंतर १५० रुपये शुल्क.

  • १ लाखाहून अधिक रकमेच्या व्यवहारांवर १००० रुपये शुल्क लागू.

  • एटीएम बॅलन्स चेकसाठी ८.५ रुपये शुल्क आकारले जाणार.

खासगी क्षेत्रातील नामांकित आयसीआयसी बँक ग्राहकांना एकामागून एक धक्के देत आहे. आधी बँकेनं खात्यात किमान शिल्लक रक्कम १० हजारवरून ५० हजार रूपये केले. दरम्यान, आता बँकेनं खात्यातून पैसे काढणे, जमा करणे, एटीएममधून पैसे काढणे यांसारख्या सर्व सेवांवरील शुल्क वाढवले आहेत. बँकेच्या नवीन आदेशानुसार, जर आपले आयसीआयसीआय बँकेत खाते असेल आणि स्वत:च्या बँक खात्यात पैसे काढले किंवा जमा केले तरी तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक शुल्क भरावे लागेल.

आयसीआयसीआय बँकेनं शुल्क वाढवले

बँकेनं त्यांच्या नवीन सेव्हिंग खातेधारकांसाठी सेवा शुल्क वाढवले आहेत. नव्या नियमानुसार, जर तुम्ही एटीएममधून पैसे काढले किंवा खात्यात जमा केले तर, तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. इकॉनॉमिक टाईम्समधील प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, बँकेच्या शाखेत जाऊन किंवा कॅश रिसायकलर मशीनद्वारे पैसे जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी नवीन शुल्क निश्चित केले आहेत.

ICICI Bank
शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी बड्या नेत्याचा राजीनामा

नवीन नियमानुसार, दर महिन्याला तीन व्यवहारानंतर प्रत्येक व्यवहारावर १५० रूपये शुल्क आकारले जाईल. १ लाखाहून अधिक रूपयांचा व्यवहार केल्यास १ हजार किंवा १५० जे अधिक असेल शुल्क भरावं लागेल. याशिवाय बँकेनं सेव्हिंग अकाऊंटसाठी थर्ड पार्टी विथड्राव्हल लिमिट २५ हजारपर्यंत केली आहे.

एटीएम व्यवहारांवरही शुल्क वाढवले

आयसीआयसीआय बँकेनं आता एटीएममधून पैसे काढणे, बॅलन्स चेक करणे, पिन जनरेट करणे, इतर एटीएमच्या निगडीत कामांवर शुल्क वाढवले आहेत. प्रत्येक आर्थिक व्यवहारावर २३ रूपये शुल्क आकारले जाईल. तसेच बँक बॅलेन्स चेक करण्यासाठी ८.५ रूपये आकारले जातील.

ICICI Bank
खोटं धर्मांतरण करून दुसरं लग्न, पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ; धुळ्यात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com