Credit Card New Rule : RBI चा नवा नियम! क्रेडिट कार्डच्या बिलिंग सायकलमध्ये करता येणार बदल

Credit Card : हल्ली तरुणाईमध्ये क्रेडिट कार्डचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. हल्ली कोणत्याही बँक सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्डची ऑफर देतात. जर तुमच्याकडेही क्रेडिट कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
Credit Card, Credit Card New Rule
Credit Card, Credit Card New RuleSaam Tv
Published On

Billing Cycle New Rule :

हल्ली तरुणाईमध्ये क्रेडिट कार्डचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. हल्ली कोणत्याही बँक सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्डची ऑफर देतात. जर तुमच्याकडेही क्रेडिट कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहे. बँकिंग नियमांमध्ये काही बदल केले आहेत. बँकिंग (Bank) नियामकाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. या नियमांनुसार सध्याचे क्रेडिट कार्ड (Credit card) ग्राहक त्यांच्या सोयीनुसार बिलिंग सायकलमध्ये बदल करु शकता.

1. क्रेडिट कार्डसाठी विशेष नियम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी एक विशेष नियम आणला आहे. हा नियम बिलिंग सायकलमधील बदलासाठी आहे. नवीन नियमानुसार कार्डधारक त्यांच्या सोयीनुसार बिलिंग सायकल बदलू शकतात. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. हा नियमही लागू करण्यात आला आहे.

Credit Card, Credit Card New Rule
Today's Gold Silver Rate : सोन्याच्या भावात पुन्हा तेजी, चांदीही वधारली; दागिने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

2. देय तारीख बदलू शकता

बिलिंग सायकलमधील बदलामुळे कर्ज भरण्याची तारीख बदलू शकता. पूर्वी हे काम सोपे नव्हते. क्रेडिट कार्ड जारी करताना कार्डचे बिलिंग चक्र ठरवले जाते. त्याच वेळी बिलिंगची तारीख आणि देय तारीख निश्चित केली जाते. कार्ड बंद होईपर्यंत हा क्रम सुरु असतो. आरबीआयने क्रेडिट कार्डधारकांना बिलिंग सायकल बदलण्याची संधी दिली आहे.

3. बिलिंग सायकल म्हणजे काय?

क्रेडिट कार्ड बिलिंग सायकल म्हणजे तुमच्या बिलिंग स्टेटमेंट्समधील कालावधी. हा बिलिंग कालावधी क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँक/NBFC मधून दुसऱ्यामध्ये बदलू शकता. त्याचा कालावधी २७ दिवसांपासून ३१ दिवसांपर्यंत असू शकतो. तुमच्या बँकेचे स्टेटमेंट बिलिंग सायकलच्या शेवटी क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँकेद्वारे तयार केले जाते.

Credit Card, Credit Card New Rule
Professional Tax: तुमच्या पगारातून कापला जाणारा प्रोफेशनल टॅक्स आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर

4. क्रेडिट कार्डची देय तारीख काय आहे?

क्रेडिट कार्ड बिल भरण्याच्या शेवटच्या तारखेला क्रेडिट कार्ड देय तारीख असे म्हणतात. ही तारीख स्टेटमेंटच्या तारखेपासून १५ ते २५ दिवसांची असते. समजा तुमचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट दर महिन्याच्या ६ तारखेला तयार झाले आहे आणि देय तारीख त्याच महिन्याच्या २६ तारखेला आहे. तर तुम्हाला तुमचे बिल २६ तारखेपर्यंत भरावी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com